नवी दिल्ली : कमजोर जागतिक कल आणि दागिने निर्माते तसेच किरकोळ विक्रेते यांनी खरेदीत केलेली कपात यामुळे सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी घसरण झाली. सोने २३५ रुपयांनी घसरून २६,९३0 रुपये तोळा झाले. चांदीचा भाव २३0 रुपयांनी घसरून ३७,0५0 रुपये किलो झाला.
औद्योगिक क्षेत्राकडून तसेच चांदीचे शिक्के बनविणाऱ्यांनी चांदीच्या खरेदीत फार उत्साह दाखविला नाही. त्याचा परिणाम म्हणून चांदीचा भाव घसरला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. तसेच ग्रीकमधील कर्ज संकटावर युरोपातील वित्तमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही गुंतवणूकदार डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सध्या मंदीचा कल दिसून येत आहे, असे ब् सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा घसरण
कमजोर जागतिक कल आणि दागिने निर्माते तसेच किरकोळ विक्रेते यांनी खरेदीत केलेली कपात यामुळे सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी घसरण झाली.
By admin | Updated: June 18, 2015 02:08 IST2015-06-18T02:08:38+5:302015-06-18T02:08:38+5:30
कमजोर जागतिक कल आणि दागिने निर्माते तसेच किरकोळ विक्रेते यांनी खरेदीत केलेली कपात यामुळे सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी घसरण झाली.
