नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदी, तसेच मागणीचा जोर ओसरल्याने दिल्ली सराफा बाजारातील तेजीला लगाम बसल्याने सोमवारी सोने आणि चांदीची झळाळी उतरली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ७० रुपयांनी कमी होत २५२३० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) स्थिरावला.
औद्योगिक क्षेत्र आणि नाणे तयार करणाऱ्यांनी उठाव कमी केल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी उतरत ३४२०० रुपयांवर (प्रति किलो) आला.
जाणकारांनुसार अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये व्याजदराबाबत निर्णय घेण्याचे ठरविल्याने सोन्याची मागणी घटली. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचाही सराफा बाजारावर परिणाम झाला.
सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी कमी होत प्रति औंस १०९२.१४ डॉलरवर, तर चांदीच्या भावात ०.१ टक्क्याने घट होत १४.७६ डॉलरवर होता.
सोने-चांदीची झळाळी उतरली
जागतिक बाजारातील मंदी, तसेच मागणीचा जोर ओसरल्याने दिल्ली सराफा बाजारातील तेजीला लगाम बसल्याने सोमवारी सोने आणि चांदीची झळाळी उतरली
By admin | Updated: August 3, 2015 22:48 IST2015-08-03T22:48:48+5:302015-08-03T22:48:48+5:30
जागतिक बाजारातील मंदी, तसेच मागणीचा जोर ओसरल्याने दिल्ली सराफा बाजारातील तेजीला लगाम बसल्याने सोमवारी सोने आणि चांदीची झळाळी उतरली
