नवी दिल्ली : कमजोर जागतिक मागणीमुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी घसरण झाली. त्याबरोबर तीन दिवसांपासूनचा तेजीचा सिलसिला थांबला. सोने १८0 रुपयांनी घसरून २७,२00 रुपये तोळा झाले. चांदीचा भाव तब्बल १,१५0 रुपयांनी घसरून ३७,0५0 रुपये किलो झाला.
औद्योगिक क्षेत्रातून असलेल्या मागणीला ओहोटी लागल्याने चांदीला फटका बसला. शिक्के निर्मात्यांकडून असलेली चांदीची मागणीही
घटली. सराफा बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात कमजोरी असतानाच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीचा दबावही सोन्या-चांदीवर दिसून आला. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाणार असल्याची भीती बाजारात दिसून आली. पर्यायी गुंतवणूक म्हणून होणारी सोन्या-चांदीची खरेदी या कारणांनी थांबली. मागणी घटण्यामागे हेही एक मुख्य कारण होते.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव १८0 रुपयांनी घटून अनुक्रमे २७,२00 रुपये आणि २७,000 रुपये तोळा झाला. गेल्या तीन दिवसांत सोने थोडे थोडे वर चढत होते. तीन दिवसांत सोन्याचा भाव ८0 रुपयांनी वाढला होता.
सोन्याच्या आठ ग्रॅमच्या शिक्क्यांचा भाव १00 रुपयांनी घसरून २३,७00 रुपये झाला.
तयार चांदीचा भाव १,१५0 रुपयांनी घसरून ३७,0५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,११0 रुपयांनी घसरून ३७,३९0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव २ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ६२ हजार रुपये आणि विक्रीसाठी ६३ हजार रुपये शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात घट
कमजोर जागतिक मागणीमुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी घसरण झाली. त्याबरोबर तीन दिवसांपासूनचा तेजीचा सिलसिला थांबला.
By admin | Updated: December 17, 2014 00:58 IST2014-12-17T00:58:37+5:302014-12-17T00:58:37+5:30
कमजोर जागतिक मागणीमुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी घसरण झाली. त्याबरोबर तीन दिवसांपासूनचा तेजीचा सिलसिला थांबला.
