नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाईच्या कलाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांत सोन्या-चांदीचा भाव बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरला. राजधानी दिल्लीत सोने ३३0 रुपयांनी घसरून २७,0३0 रुपये तोळा झाले. चांदी ५३0 रुपयांनी घसरून ३४,९७0 रुपये किलो झाली.
औद्योगिक क्षेत्राकडून तसेच शिक्के निर्मात्यांकडून फारशी खरेदी न झाल्याचा फटका चांदीला बसला. चांदीचा भाव ३५ हजारांच्या खाली आला. दुसरीकडे स्थानिक दागिने निर्मात्यांनी बाजाराकडे पाठ फिरविल्यामुळे सोन्याचा भाव घसरला. जागतिक पातळीवरील घसरणीमुळे दागिने निर्मात्यांनी खरेदीत हात आखडता घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतातील बाजारावर परिणाम करणाऱ्या सिंगापुरात सोन्याचा भाव 0.६ टक्क्यांनी घसरून १,१३३.४७ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.८ टक्क्यांनी घसरून १४.५७ डॉलर प्रति औंस झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
अशी झाली घसरण
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३३0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,0३0 रुपये आणि २६,८८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला.
काल सोने २१५ रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी घसरून २२,६00 रुपये झाला. तयार चांदीचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ५0 हजार रुपये आणि विक्रीसाठी ५१ हजार रुपये प्रति शेकडा झाला.
शेअर बाजारातील भाव घसरल्यास सोन्या-चांदीचे भाव वाढतात. बुधवारी शेअर बाजार घसरूनही सोन्या-चांदीचे भाव वाढले
नाहीत.
सोने-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण
जागतिक बाजारातील नरमाईच्या कलाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांत सोन्या-चांदीचा भाव बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरला. राजधानी दिल्लीत सोने ३३0 रुपयांनी घसरून
By admin | Updated: August 27, 2015 01:39 IST2015-08-27T01:39:37+5:302015-08-27T01:39:37+5:30
जागतिक बाजारातील नरमाईच्या कलाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांत सोन्या-चांदीचा भाव बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरला. राजधानी दिल्लीत सोने ३३0 रुपयांनी घसरून
