नवी दिल्ली : जागतिक सराफा बाजारात तेजी असतानाही ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी हात आखडता घेतल्याने राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्या-चांदीचा बाजार आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला.
सोन्याचा भाव २७,४00 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा भाव ३९,000 प्रतिकिलो असा राहिला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी सोन्या-चांदीची खरेदी मर्यादित ठेवली. त्यामुळे भाववाढ झाली नाही. या उलट जागतिक बाजारात मात्र तेजीचे वातावरण दिसून आले. सिंगापुरातील सोन्या-चांदीच्या बाजारात सोन्याचा भाव 0.५ टक्क्यांनी वाढून १,२२७.१६ डॉलर प्रतिऔंस राहिला. राजधानीत दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव अनुक्रमे २७,४00 रुपये आणि २७,२00 रुपये प्रतिदहा ग्राम राहिला. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या गिन्नीचा भाव २४,२00 रुपये राहिला.
तयार चांदीचा भावही कालच्याच पातळीवर ३९,000 रुपये किलो राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र ३५५ रुपयांनी वाढून ३८,८१0 रुपये किलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीचे भाव स्थिर
जागतिक सराफा बाजारात तेजी असतानाही ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी हात आखडता घेतल्याने राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्या-चांदीचा बाजार आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला.
By admin | Updated: October 10, 2014 03:57 IST2014-10-10T03:57:01+5:302014-10-10T03:57:01+5:30
जागतिक सराफा बाजारात तेजी असतानाही ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी हात आखडता घेतल्याने राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्या-चांदीचा बाजार आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला.
