Gold Silver Price: सराफा बाजारात, २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ११३००० च्या पुढे गेला आहे आणि चांदी १३१००० च्या पुढे गेली आहे. आज सोनं ७४४ रुपयांनी महाग झालं आहे आणि जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १०९८४१ रुपये झालंय. तर, ३ टक्के जीएसटीसह त्याची किंमत आता ११३१३६ रुपये झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात २८४९ रुपयांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदी दोघांनीही नवीन उच्चांक गाठला आहे.
या सप्टेंबरमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम ७४५३ रुपयांनी महाग झालंय. तर चांदीच्या किमतीत प्रति किलो ९७७६ रुपयांनी वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या व्यापाराच्या दिवशी सोनं १०२३८८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. चांदी देखील ११७५७२ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
आयबीजेएनुसार, जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोन्याचा भाव आज म्हणजेच शुक्रवारी १०९८४१ रुपयांवर उघडला. तर गुरुवारी तो १०९०९७ रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे, जीएसटीशिवाय चांदीचा भाव १२४४९९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
१४ ते २३ कॅरेटचा भाव काय?
आज २३ कॅरेट सोन्याचा भावही ७४१ रुपयांनी वाढून १०९४०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता ११२६८३ रुपये झालीये. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६८१ रुपयांनी वाढून १००६१४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह तो १०३६३२ रुपये झालाय.
आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५८ रुपयांनी वाढून ८२३८१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि जीएसटीसह तो ८४८५२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६६१८४ रुपयांवर पोहोचलाय. सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.