नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी तेजी परतली. आज सोन्याचा भाव २१० रुपयांनी वधारून २७,०८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात लग्नसराईची वाढ नोंदली गेली आहे. चांदीचा भावही २०० रुपयांनी वाढून ३७,००० रुपये प्रतिकिलो राहिला.
जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव दोन आठवड्यांच्या नीचांकावरून वधारला. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह २००६ नंतर प्रथमच गुंतवणूक दरात वाढ करण्याची शक्यता आहे. लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक बाजारात सराफा व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केल्यानेही या मौल्यवान धातूंच्या भावात वाढ नोंदली गेली आहे.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांनी वाढून १,२०७.७० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.३ टक्क्यांनी वाढून १६.४० डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून २३,७०० रुपये प्रतिकिलो आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ३२५ रुपयांनी वधारून ३६,६७० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव जोरदार मागणीने हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ५६,००० रुपये व ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २१० रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,०८० रुपये व २६,९३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या दोन दिवसांत २१० रुपयांनी घट झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १०० रुपयांच्या तेजीसह २३,७०० रुपये झाला.
सोने-चांदीच्या भावात सुधारणा
सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी तेजी परतली. आज सोन्याचा भाव २१० रुपयांनी वधारून २७,०८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
By admin | Updated: April 16, 2015 23:46 IST2015-04-16T23:46:14+5:302015-04-16T23:46:14+5:30
सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी तेजी परतली. आज सोन्याचा भाव २१० रुपयांनी वधारून २७,०८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
