नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याचा भाव 125 रुपयांनी वधारून 28,525 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही तेजीचा कल होता. तिकडे चांदीचा भावही औद्योगिक संस्थांच्या मागणीने 1क्क् रूपयांनी वाढून 45,क्क्क् रुपये प्रतिकिलोवर आला.
सणासुदीच्या काळात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने सराफा व्यापा:यांनी खरेदी केली. दिल्ली बाजारात 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 125 रुपयांनी वधारून अनुक्रमे 28,525 रुपये आणि 28,325 रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा भावही 1क्क्ने उंचावून 45,क्क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 95 रुपयांनी वाढून 44,25क्
रुपये प्रतिकिलो राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)