नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक बाजारात कमी झालेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. सोने १0 रुपयांनी उतरून २५,८१0 रुपये तोळा, तर चांदी १५0 रुपयांनी उतरून ३४,२५0 रुपये किलो झाली.
औद्योगिक क्षेत्रातील, तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेली मागणी कमी झाल्याचा फटका चांदीला बसला. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील नरमाई हे घसरणीचे मुख्य कारण असले तरी, इतरही काही कारणांमुळे सराफा बाजारात घसरण झाली. यंदाच्या वर्ष अखेरीस अमेरिकेतील व्याजदर वाढणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून डॉलरचा दर वाढला. त्यामुळे सोने उतरले. त्याबरोबरच ज्वेलरांनी आपली मागणी कमी केली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १0 रुपयांनी उतरून अनुक्रमे २५,८१0 रुपये आणि २५,६६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १५0 रुपयांनी घसरून २२,२00 रुपये झाला. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही घसरला. तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी उतरून ३४,२५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २0५ रुपयांनी उतरून ३३,८२५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र कायम राहिला.
मागणीत घट झाल्याने सोने-चांदी उतरले!
जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक बाजारात कमी झालेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली.
By admin | Updated: November 28, 2015 00:00 IST2015-11-28T00:00:26+5:302015-11-28T00:00:26+5:30
जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक बाजारात कमी झालेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली.
