Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने व चांदी आणखी स्वस्त

सोने व चांदी आणखी स्वस्त

जागतिक बाजारातील मंदी आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेल्या मागणीमुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी स्वस्त होऊन २५,७७५ रुपये झाले.

By admin | Updated: December 8, 2015 23:45 IST2015-12-08T23:45:13+5:302015-12-08T23:45:13+5:30

जागतिक बाजारातील मंदी आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेल्या मागणीमुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी स्वस्त होऊन २५,७७५ रुपये झाले.

Gold and Silver are more affordable | सोने व चांदी आणखी स्वस्त

सोने व चांदी आणखी स्वस्त

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदी आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेल्या मागणीमुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी स्वस्त होऊन २५,७७५ रुपये झाले. उद्योगांकडून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी नसल्यामुळे चांदी किलोमागे ५७५ रुपयांनी स्वस्त होऊन ३४,४२५ रुपये झाली.
सिंगापूरच्या बाजारात सोने औंसमागे ०.२ टक्क्याने स्वस्त होऊन १,०६९.९० अमेरिकन डॉलर झाले. न्यूयॉर्कच्या बाजारात सोमवारी सोने औंसमागे १.३९ टक्क्यांनी खाली येऊन १,०७१.२० अमेरिकन डॉलर झाले होते.
राजधानी दिल्लीच्या सराफ बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १० गॅ्रममागे १७५ रुपयांनी खाली येऊन अनुक्रमे २५,७७५ व २५,६२५ रुपये झाले. सोने सोमवारी ५० रुपयांनी खाली आले होते. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याचा भाव २२,२०० रुपये असा स्थिर होता. तयार चांदी किलोमागे ५७५ रुपयांनी स्वस्त होऊन ३४,४२५ आणि वीकली बेसड् डिलेव्हरीची चांदी ५८५ रुपयांनी खाली येऊन ३४,६०० रुपये झाली. चांदीच्या १०० नाण्यांच्या खरेदीचा भाव एक हजाराने खाली येऊन ४७ हजार, तर विक्रीचा भाव ४८ हजार रुपये झाला.
निर्बंधांमुळे सोन्याच्या
तस्करीत वाढ-सिन्हा
सोन्याच्या आयातीवर निर्बंध असल्यामुळे सोन्याची तस्करी वाढली आहे. सोने तस्करीसाठी शरीरात लपवून, विमान व सामानात दडवून आणले जाते. अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, देशात सोने आणण्यासाठी अनेक प्रकार व माध्यमे वापरली जात आहेत. सीमावर्ती व समुद्र किनाऱ्यांचाही यासाठी उपयोग केला जातो.

Web Title: Gold and Silver are more affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.