नवी दिल्ली : देशातील दागिने निर्मात्यांकडून आलेली मागणी आणि जागतिक बाजाराने घेतलेल्या उसळीमुळे सोने सोमवारी १० ग्रॅममागे २३५ रुपयांनी महाग होऊन २६,१५० रुपयांवर गेले. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात होणारी घट यामुळे रोखली गेली. औद्योगिक क्षेत्र आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीदेखील किलोमागे ३०० रुपयांनी वधारून ३४,६०० रुपयांवर गेली.
पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर सोने हे गुंतवणुकीसाठी स्वर्गीय साधन असल्याच्या परंपरेला नव्याने ताकद दिली व त्यामुळे सोने वधारले, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिवाय सध्याच्या लग्नसराईमुळेही सोने महाग व्हायला हातभारच लागला.
सिंगापूरचा बाजार बहुतांशवेळा येथील सोन्याचा भाव निश्चित करतो. सिंगापूरच्या बाजारात सोने औंसमागे १.२ टक्क्यांनी वाढून १,०९६.४४ अमेरिकन डॉलरवर, तर चांदी औंसमागे १.३ टक्क्यांनी वाढून १४.४४ अमेरिकन डॉलरवर गेली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० गॅ्रममागे २३५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,१५० व २६,००० रुपये झाले. सोन्याचा भाव गेल्या दोन सत्रांमध्ये १० ग्रॅममागे ३३५ रुपयांनी खाली आला होता. आठ ग्रॅमच्या सुवर्ण नाण्याचा भाव मर्यादित व्यवहारात २२,२०० रुपये स्थिर होता. तयार चांदी किलोमागे ३०० रुपयांनी वाढून ३४,६००, तर वीकली बेस्ड् डिलिव्हरीची चांदी किलोमागे ४५० रुपयांनी वधारून ३४,२६० रुपयांवर गेली.
१०० चांदीच्या नाण्यांचा भाव खरेदीसाठी ४८ हजार, तर विक्रीसाठी ४९ हजार रुपये असा स्थिर राहिला.
सोने-चांदी उसळले
देशातील दागिने निर्मात्यांकडून आलेली मागणी आणि जागतिक बाजाराने घेतलेल्या उसळीमुळे सोने सोमवारी १० ग्रॅममागे २३५ रुपयांनी महाग होऊन २६,१५० रुपयांवर गेले.
By admin | Updated: November 17, 2015 03:22 IST2015-11-17T03:22:53+5:302015-11-17T03:22:53+5:30
देशातील दागिने निर्मात्यांकडून आलेली मागणी आणि जागतिक बाजाराने घेतलेल्या उसळीमुळे सोने सोमवारी १० ग्रॅममागे २३५ रुपयांनी महाग होऊन २६,१५० रुपयांवर गेले.
