Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने ३० महिन्यांच्या उच्चांकावर

सोने ३० महिन्यांच्या उच्चांकावर

येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव ३१,५५0 रुपये होऊन ३0 महिन्यांच्या उच्चांकावर गेला. चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली.

By admin | Updated: September 8, 2016 04:59 IST2016-09-08T04:59:19+5:302016-09-08T04:59:19+5:30

येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव ३१,५५0 रुपये होऊन ३0 महिन्यांच्या उच्चांकावर गेला. चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली.

Gold at 30-month high | सोने ३० महिन्यांच्या उच्चांकावर

सोने ३० महिन्यांच्या उच्चांकावर

नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव ३१,५५0 रुपये होऊन ३0 महिन्यांच्या उच्चांकावर गेला. चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के सोन्याचा भाव प्रत्येकी ४५0 रुपयांनी वाढून ३१,५५0 रुपये आणि ३१,४00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. २४ फेब्रुवारी २0१४ नंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. त्या दिवशी सोने ३१,५00 रुपये प्रति १0 ग्रॅम होते. गेल्या चार दिवसांत सोने १५0 रुपयांनी वाढले होते. आज सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १00 रुपयांनी वाढून २४,४00 रुपये झाला. दिल्लीच्या बाजारात तयार चांदीचा भाव १,0१६ रुपयांनी वाढून ४७,४२५ रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ७५0 रुपयांनी वाढून ४६,९५0 रुपये किलो झाला.
सिंगापूर येथील बाजारात सोने 0.२ टक्क्यांनी वाढून १,३५२.१६ डॉलर प्रति औंस झाले. काल त्यात १.७ टक्क्यांची वाढ झाली होती. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ७७ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७८ हजार रुपये प्रति शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold at 30-month high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.