Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने ३ वर्षांच्या नीचांकावर

सोने ३ वर्षांच्या नीचांकावर

दागदागिने आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी भाव आणखी उतरण्याच्या अपेक्षेने खरेदी टाळली. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आल्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला.

By admin | Updated: November 6, 2014 02:42 IST2014-11-06T02:42:41+5:302014-11-06T02:42:41+5:30

दागदागिने आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी भाव आणखी उतरण्याच्या अपेक्षेने खरेदी टाळली. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आल्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला.

Gold at 3-year low | सोने ३ वर्षांच्या नीचांकावर

सोने ३ वर्षांच्या नीचांकावर

नवी दिल्ली : डॉलर भक्कम होताच मागणीचा जोर ओसरल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव तीन वर्षांचा नीचांक गाठत २५,९०० रुपयांवर (प्रति दहा गॅ्रम) आला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४५० रुपयांनी, तर चांदीचा भाव ९०० रुपयांनी घसरला.
दागदागिने आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी भाव आणखी उतरण्याच्या अपेक्षेने खरेदी टाळली. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आल्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला.
औद्योगिक क्षेत्र आणि नाणे तयार करण्याऱ्यांकडून मागणीत जोर नसल्याने दिल्ली सराफा बाजारात चांदीची झळाळी ९०० रुपयांनी कमी झाल्याने चांदीचा भाव ३५,०५० रुपयांवर (प्रतिकिलो) आला.
डॉलर मजबूत झाल्याने मागणी घटल्याने जागतिक बाजारात मंदी आली.
सिंगापूरमध्येही सोन्याचा १.९० टक्क्यांनी घसरत १,१४६.३४ डॉलरवर (प्रति औंस) आला. एप्रिल २०१० नंतरचा हा नीचांक होय. चांदीचा भावही ३.४ टक्क्यांनी घटत १४.४८ डॉलरवर (प्रति औंस) आला.
नोव्हेंबर २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव ४ वर्षांच्या नीचांक पातळीवर आहेत. भाव कमी होण्यामागचे कारण म्हणजे सोन्यामधील गुंतवणुकीत होणारी घट, डॉलरची मजबुती आणि तेलाच्या भावातील घसरण होय.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वधारण्याची शक्यता कमी आहे. मंदीचे संकेत यावर्षाच्या सुरुवातीपासूनच दिसू लागले
होते.
राजकीय स्थितीही सोन्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. रशिया आणि युक्रेनच्या दरम्यानचा तणाव कमी होत आहे. शेअर बाजाराला गुंतवणूकदारांनी अधिक पसंती दिली तर सोन्याची मागणी कमी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold at 3-year low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.