Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय

राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय

राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:41+5:302014-08-21T21:45:41+5:30

राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय

The goal of sustainable development of 82 percent of dryland farming in the state | राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय

राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय

ज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय
मुख्यमंत्री : आगामी पंचवार्षिक अजेंडा जाहीर
नांदेड : दुष्काळ, गारपीट, टंचाईच्या नैसर्गिक संकटात बळीराजाला साथ देत राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत सुमारे 11 हजार कोटी खर्च केल़े परंतु केवळ तत्कालीक उपाययोजना करून भागणार नाही, त्यामुळे येणारे आमचे सरकार पुढील पाच वर्षांत राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली़
नांदेड-विष्णुपूरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अद्ययावत वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होत़े व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी़पी़ सावंत आदी उपस्थित होत़े
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात केवळ 18 टक्के जमीन सिंचनाखाली आह़े त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात 82 टक्के कोरडवाहू जमिनीवर अवलंबून असलेला शेतकरी संकटात सापडतो़ त्यांना सरकार मदतही करत़े परंतु या कोरडवाहू शेतीचा शाश्वत विकास हेच यापुढचे ध्येय असेल़ दुष्काळावर भाष्य करत ते म्हणाले, 50 टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या राज्यातील 138 तालुक्यांना विशेष सवलती दिल्या आहेत़ मराठवाड्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेवून आणखी काही तालुके यादीत समाविष्ट केले जातील़ पूर्वी सवलती देताना जिल्हा घटक होता, आता तो तालुका ठेवल्याने टंचाईग्रस्तांचा अधिकाधिक समावेश होऊ शकणार आह़े
याप्रसंगी खा़अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांचीही भाषणे झाली़ (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
फोटो
21 नांदेड या नावाने फोटो पाठविण्यात आला आह़े
फोटो ओळी
नांदेडमध्ये गुरुवारी गोदावरी नदीवरील पुलाचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण़ समवेत माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण, पालकमंत्री डी़पी़ सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, आ़विक्रम काळे आदी़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

Web Title: The goal of sustainable development of 82 percent of dryland farming in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.