विलास ओहाळ
पणजी : ऐश-आराम, आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने गोव्यात येतात. याच पर्यटनातून मिळणारा विविध प्रकारचा महसूल हा राज्य सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत. पण गोव्यातील सुप्रसिद्ध कॅसिनोंचा विचार केला तर जीएसटीनंतर हा कॅसिनो राज्य सरकारसाठी तोट्याचा धंदा ठरला आहे. उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
गोव्यातील मांडवी नदीवरील तरंगते कॅसिनो हे गोव्यातील पर्यटकांचे खास आकर्षण. या नदीवरील व जमिनीवरील हॉटेलमध्ये मिळून १३ कॅसिनो गोव्यात आहेत.
हे कॅसिनो गेल्या वर्षीपर्यंत राज्य सरकारला सरासरी १५० कोटी रुपयांच्या घरात महसूल देत होते. पण जीएसटी आला आणि गोव्याला कॅसिनोपासून मिळणारे उत्पन्नच घटले.
या कॅसिनोमधून गोवा राज्य सरकारला मनोरंजन करामार्फत २०१२-१३ मध्ये ७७.९० लाख कोटी रुपये मिळणारे उत्पन्न २०१६-१७ मध्ये १७१ कोटी रुपयांच्यात घरात गेले. दरवर्षी त्यात वाढ होत गेली. पण १ जुलै २०१७ पासून लागू झालेल्या जीएसटीनंतर हे उत्पन्न आता सरासरी ८ ते ९ कोटी रुपयांच्या घरातच आहे.
जुलैत लागू झालेल्या जीएसटीचा पहिला भरणा आॅगस्टमध्ये झाला. आॅगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यात कॅसिनोंपासून फक्त ३९.९२ कोटी रुपयांचा जीएसटी राज्य सरकारला प्राप्त झाला.
कॅसिनोंमध्ये येणाºया पर्यटक व अभ्यागतांची संख्या वाढत आहे. यामुळेच कॅसिनोपासून मिळणाºया २०१६-१७ च्या महसुलात अडीच
पट वाढ झाली.
- राजन सातार्डेकर, व्यवसाय कर अतिरिक्त आयुक्त, गोवा
गोवा सरकारच्या ‘कॅसिनो’ महसुलात घट , जीएसटी कायद्यानंतर बसला फटका
ऐश-आराम, आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने गोव्यात येतात. याच पर्यटनातून मिळणारा विविध प्रकारचा महसूल हा राज्य सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:54 IST2018-01-19T01:54:20+5:302018-01-19T01:54:32+5:30
ऐश-आराम, आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने गोव्यात येतात. याच पर्यटनातून मिळणारा विविध प्रकारचा महसूल हा राज्य सरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत
