Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्लोबल सिटी ...२ ...

ग्लोबल सिटी ...२ ...

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:36+5:302014-12-27T23:38:36+5:30

Global City ... 2 ... | ग्लोबल सिटी ...२ ...

ग्लोबल सिटी ...२ ...

>बॉक्स
अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी
नागपूर : नागपुरात गंुतवणुकीच्या प्रचंड संधी आहे. नागपूर हे उत्पादन हब बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि टायगर प्रकल्प आहेत. जैविक इंधन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. टाकाऊ भाज्या आणि फळांपासून बनविलेल्या जैविक इंधनाचे डिझेलमध्ये मिश्रण केल्यास डिझेलचा दर प्रति लिटर १० रुपयांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च कमी होऊन रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. भारत १०० दशलक्ष डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि एक लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. अनिवासी भारतीयांनी या दोन्ही क्षेत्रात उत्पादन प्रकल्प नागपुरात सुरू करावेत. विदर्भात पर्यटनाच्या प्रचंड संधी असल्याचे गडकरी म्हणाले. वैदर्भीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनिवासी भारतीयांनी मिहान-सेझमध्ये विविध उद्योग सुरू करावे, नागपूरला जैविक फार्मिंग कॅपिटल बनवावे, कॉटन आणि सिल्क टेक्सटाईल इंडस्ट्री, मायनिंग आणि मिनरल ट्रेडिंग, लॉजिस्टिक सेंटर सुरू करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

Web Title: Global City ... 2 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.