अरातवीमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारएक महिन्यानंतर पोलिसांत तक्रार :अमरावती : दोन नराधमांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी तिवसा पोलीस ठाण्यांंतर्गत येणार्या डेहनी गावात उघडकीस आली. तब्बल एक महिन्यानंतर पीडितेने तिवसा पोेलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, चौदा वर्षीय पीडित विद्यार्थिनी तिवसा येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ती शौचास जात असताना तिला रोशन पुरुषोत्तम वानखडे (२२) व नंदू रमेश अवझाड (२८, दोन्ही रा. डेहनी) यांनी अडविले. तोंड दाबून या दोघांनी तिला निर्जन स्थळी नेले. त्यांचा तिसरा साथीदार अतुल सुखदेवराव तायडे (२८) हा तेथे पाळत ठेवून होता. रोशन व नंदू या दोघांनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. नराधमांचा प्रतिकार करताना मुलगी जखमी झाली होती. घटनेची माहिती तिने आई-वडिलांना दिली. घटनेनंतर पालकांनी तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार न देण्यासाठी आरोपींनी पीडित मुलीवर दबाव आणला होता. परंतु तब्बल एक महिन्यानंतर शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी या घटनेची तक्रार पीडित विद्यार्थिनीने तिवसा पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी आरोपी रोशन वानखडे व नंदू अवझाड यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
अमरावतीमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
अमरातवीमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:16+5:302014-09-12T22:38:16+5:30
अमरातवीमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
