नवी दिल्ली : शेअर बाजाराचा वापर काळा पैसा मायदेशी आणणे आणि करचोरीसाठी होत आहे का, याची चौकशी होत आहे. सेबी आणि अन्य नियामक यंत्रणांना विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी ग्लोबल डिपॉझिटरी रिसीटस् (जीडीआर) चा वापर होत असल्याचा संशय आहे. काळा पैसा भारतात आणण्यासाठी स्वीत्झर्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, मॉरिशस, दुबई व कॅनडा आदी देशांमध्ये नोंदणीकृत संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाकडे (सेबी) अशी काही प्रकरणे आली आहेत की त्यातून विदेशात सूचीबद्ध कंपन्यांमार्फत गुंतवणुकीच्या माध्यमातून काळा पैसा परत आणण्याचा संशय निर्माण झाला आहे. अन्य यंत्रणांनीही असाच संशय व्यक्त केला आहे.