Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल पंप ११ ला बंद

पेट्रोल पंप ११ ला बंद

राज्यातील ४२०० पेट्रोलपंप ११ रोजी बंद राहणार

By admin | Updated: August 3, 2014 00:53 IST2014-08-01T22:30:48+5:302014-08-03T00:53:03+5:30

राज्यातील ४२०० पेट्रोलपंप ११ रोजी बंद राहणार

Gasoline pump closes on 11 | पेट्रोल पंप ११ ला बंद

पेट्रोल पंप ११ ला बंद

राज्यातील ४२०० पेट्रोलपंप ११ रोजी बंद राहणार
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे आंदोलन : पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करा
औरंगाबाद : राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी ११ ऑगस्ट रोजी राज्यातील ४२०० पेट्रोलपंप दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनने शुक्रवारी सांगितले.
औरंगाबादेत आयोजित बैठकीत असोसिएशनचे राज्यातील २६ महानगरपालिकेतील पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले की, देशात फक्त महाराष्ट्रातच २६ मनपा हद्दीत पेट्रोल व डिझेलवर एलबीटी कर २ ते ५ टक्क्यांपर्यंत आकारण्यात येत असल्यामुळे प्रतिलिटर २ ते ४ रुपयांनी भाववाढ होते. याशिवाय मुंबई महानगरपालिका हद्दीत भारतातील दोन मुख्य रिफायनरी आहेत. मुंबई मनपा रिफायनरीने आयात केलेल्या कच्च्या तेलावर जकात आकारते. यामुळे किमतीत आणखी २.५० रुपयांची भर पडते. परिणामी, राज्यातील सर्व मनपा हद्दीतील वाहनधारकांना पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी प्रतिलिटरमागे ५ ते ६ रुपये जास्त मोजावे लागत आहेत.
प्रमुख मागण्या-
१) राज्यभरात पेट्रोल-डिझेलच्या सारख्याच किमती असाव्यात.
२) सोन्याप्रमाणे पेट्रोल-डिझेलवरही ०.१ टक्केच एलबीटी आकारावी.
३) डिझेलवरील व्हॅट ३ टक्क्यांनी कमी करण्यात यावा.
४) राज्य सरकारने मुंबई मनपास कच्च्या तेलावर जकात वसूल न करण्याचा आदेश द्यावा.

Web Title: Gasoline pump closes on 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.