नवी दिल्ली : नवीन वर्षापासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अनुदान ग्राहकाकडे हस्तांतरित करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य नसल्याचे स्पष्टीकरण सोमवारी सरकारने संसदेत दिले. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यातही जमा केले जाऊ शकते, असे सरकारने सांगितले.
पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत सांगितले की, ग्राहकाकडे आधार क्रमांक नसल्यास अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नवीन नियमावलीनुसार, आधार क्रमांक नाही म्हणून कुणालाही अनुदान नाकारले जाणार नाही.
थेट लाभ हस्तांतरण योजना जिल्ह्यात सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या काळात यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.
अनुदान नाकारणाऱ्यांची संख्या कमी
देशात स्वत:हून अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर नाकारणाऱ्यांची संख्या १२,४५० पर्यंत पोहोचली आहे. देशात १५ कोटी एलपीजी ग्राहकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ०.००८ टक्के एवढे आहे. सरकार २०१२ वर्षापासून आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या वर्गाला स्वत:हून एलपीजी अनुदान नाकारण्याचा आग्रह करत आहे. श्रीमंतांनी घरगुती गॅसवरील अनुदान घेणे बंद करावे आणि केवळ गरजूंनाच याचा लाभ व्हावा, असे सरकारला वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जानेवारीपासून गॅस सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार
नवीन वर्षापासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अनुदान ग्राहकाकडे हस्तांतरित करण्यासाठी आधार क्रमांक
By admin | Updated: December 16, 2014 05:00 IST2014-12-16T05:00:29+5:302014-12-16T05:00:45+5:30
नवीन वर्षापासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अनुदान ग्राहकाकडे हस्तांतरित करण्यासाठी आधार क्रमांक
