क्याण- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या कल्याणच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपत धर्मजागृतीबरोबरच लोकजागृतीचे महत्वाचे कार्य आजही सुरू ठेवले आहे. ती परंपरा कायम ठेवण्याची आपणा सर्व गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी आहे. आपल्या गणपती मंडळाकडून कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी कार्यकर्ते घेतील, असा विश्वास कल्याण शहरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सल्लागार अभिमन्यू गायकवाड यांनी व्यक्त केला. कल्याण शहरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ गेली २४ वर्षे कार्यरत आहे. ८० च्या वर सार्वजनिक गणपती मंडळ त्यांचे सदस्य आहेत. यावर्षी कार्तिक कोटक यांची या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. मंडळाच्या सहजानंद चौकातील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे सोमवारी गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मंडळाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले प्रदीप नातू, विजय कडव, गीता कोटक, टिटवाळ्याचे राजा सावंत यांच्यासह महामंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते................................................................वार्ताहर- विनायक बेटावदकर
कल्याणातील गणशोत्सव मंडळ नियमांचे पालन क रतील
कल्याण- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या कल्याणच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपत धर्मजागृतीबरोबरच लोकजागृतीचे महत्वाचे कार्य आजही सुरू ठेवले आहे. ती परंपरा कायम ठेवण्याची आपणा सर्व गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी आहे. आपल्या गणपती मंडळाकडून कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी कार्यकर्ते घेतील, असा विश्वास कल्याण शहरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सल्लागार अभिमन्यू गायकवाड यांनी व्यक्त केला.
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST2014-08-26T21:56:33+5:302014-08-26T21:56:33+5:30