अोला : गणेश घाटांवर विसर्जन न करता थेट पुलावरून विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती तिसर्या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला. ही बाब गंभीरतेने घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार पाचही गणेश घाटालगतच्या मोर्णा नदीच्या पात्रातील गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करण्यात आले. शहरातील लहान-मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मनपा प्रशासनाच्यावतीने पाच ठिकाणी गणेश घाटांची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने महाराणा प्रताप बागेमागील गणेश घाट, हरिहर पेठ, निमवाडी परिसर, अनिकट व कौलखेडस्थित हिंगणा येथील गणेश घाटांचा समावेश आहे. गणेश घाटांवर विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे प्रशासनाने कापशी तलावात विसर्जन केले; परंतु ज्या गणेश भक्तांनी निमवाडी परिसर, हिंगणा व हरिहर पेठ येथील गणेश घाटालगत मोठ्या गणेश मूर्तींर्ंचे विसर्जन केले, अशा मूर्तींचे विसर्जन झालेच नसल्याचे तिसर्या दिवशी समोर आले. अनेक मोठ्या गणेश मूर्ती पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा यांनी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या लक्षात आणून दिला. उपायुक्तांनी सुद्धा तत्काळ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना गणेश मूर्तींचे पुन्हा रीतसर विसर्जन करण्याचे आदेश दिले. बॉक्स...नदी काठच्या मुलांनी केली मदतनदीत विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन कसे व कोणी करायचे, हे शोधण्यासाठी कार्यकारी अभियंता मनोहर नदीकाठावर गेले असता, नदीत लोहचुंबकाने पैसे शोधणारी मुले समोर आली. हरिहरपेठ,निमवाडी परिसरातील गणेश मूर्तींचे या मुलांनी तर हिंगणा येथे चक्क गुराख्यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मदत केली.कोट..८ सप्टेंबरला गणेश विसर्जन केल्यानंतर काही गणेश मंडळांनी ९ व १० सप्टेंबर रोजी सुद्धा गणेश मूर्तींचे विसर्जन केले. शिवाय नदीचा पूर ओसरल्याने बहुतांश गणेश मूर्ती विरघळल्याच नाहीत. अशा मूर्तींचे पुन्हा विसर्जन केले.-जयप्रकाश मनोहर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मनपा-फोटो-१२सीटीसीएल-३९--
गणपती बाप्पांचे पुन्हा विसर्जन गणेश मूर्ती तरंगल्या; मनपाचा पुढाकार
अकोला : गणेश घाटांवर विसर्जन न करता थेट पुलावरून विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती तिसर्या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला. ही बाब गंभीरतेने घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार पाचही गणेश घाटालगतच्या मोर्णा नदीच्या पात्रातील गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करण्यात आले.
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:25+5:302014-09-11T22:30:25+5:30
अकोला : गणेश घाटांवर विसर्जन न करता थेट पुलावरून विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती तिसर्या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला. ही बाब गंभीरतेने घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार पाचही गणेश घाटालगतच्या मोर्णा नदीच्या पात्रातील गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करण्यात आले.
