मर्तिकारांनी सांगितला मार्केटचा बदलता ट्रेंड औरंगाबाद : पूर्वी भाजीपाला खरेदी करावा, तशी मूर्तीच्या भावात घासाघीस केली जात होती. मात्र, आता मानसिकता बदलत असून कलात्मक गणेशमूर्तींचे मोल न करता खरेदी करणारा नवा वर्ग तयार झाला आहे, हाच गणेशोत्सवातील मार्केटचा बदलता ट्रेंड आहे, असे मूर्तिकार नंदकिशोर परदेशी यांनी सांगितले. शहरात पिढ्यान्पिढ्या गणेशमूर्ती तयार करणारे खानदानी मूर्तिकार आहेत. त्यातीलच एक नंदकिशोर परदेशी यांनी नेहमी गणेशाची अनंतरूपे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर रंगसंगतीतही नवनवीन प्रयोग करीत आहेत. यामुळे त्यांचे गणपती विदेशातही पाठविले जातात. परदेशी यांनी सांगितले की, साच्यातून एकसारख्या शेकडो मूर्ती तयार करणे यात काही कलात्मकता नसते. अशा मूर्ती कोणीही तयार करू शकतो. मात्र, हाताने मूर्ती घडविणे यातच मूर्तिकाराचे कौशल्य पणाला लागते. औरंगाबादेत मूर्तिकरांची नवीन पिढी अशा कलात्मक गणपती मूर्ती साकारण्यासाठी अग्रेसर आहे. साच्यातून काढून शेकडो मूर्ती तयार करण्यापेक्षा मोजक्याच पण नावीन्यपूर्ण, कल्पक मूर्ती तयार करण्याकडे आमचा कल असतो. गणपती निर्मितीत पेण शहराचे नाव घेतले जाते; पण उत्कृष्ट मूर्ती घडविण्यात औरंगाबादेतील मूर्तिकारांनी आपली ओळख निर्माण केली आहे. गणेशाची अनंतरूपे आहेत. त्यापैकी १७५ नवीन रूपे आम्ही यंदा साकारली आहेत. त्यातही रंगसंगती उठावदार केल्याने सर्व मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. परदेशी म्हणाले की, पूर्वी ग्राहक मूर्ती खरेदीसाठी येत असत, तेव्हा भावात घासाघीस करीत असत. मात्र, आता किमतीपेक्षा मूर्तीच्या कलात्मकतेकडे जास्त लक्ष देत आहेत. घरगुती ग्राहकही हजार रुपयांची मूर्ती सहज खरेदी करीत आहेत. हाच ग्राहकांच्या मानसिकतेतील बदल यंदा अधोरेखित करण्यासारखा आहे. कॅप्शनकलात्मक मूर्ती दाखविताना मूर्तिकार नंदकिशोर परदेशी.
्न्नग्लेज पुरवणीसाठी बातमी नं ४ कलात्मक मूर्तीचे गणेशभक्त मोल करीत नाहीत
मूर्तिकारांनी सांगितला मार्केटचा बदलता ट्रेंड
By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:30+5:302014-08-28T20:55:30+5:30
मूर्तिकारांनी सांगितला मार्केटचा बदलता ट्रेंड
