नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने शेअर बाजारात गेल्यावर्षी गुंतविलेल्या रकमेवर नकारात्मक रिटर्न मिळाले आहेत. भविष्य निर्वाह निधीची ५,९२० कोटी रुपयांची रक्कम गुंतविण्यात आली होती. त्यावर ९.५४ टक्क्यांनी नकारात्मक रिटर्न प्राप्त झाले. त्यामुळे शेअर बाजारात पैसा गुंतविण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या रकमेचे भविष्य निर्वाह निधीने विश्लेषण केले असता त्यात ही बाब आढळली.चालू वित्तीय वर्षात गुंतविण्यात आलेल्या ५,९२० कोटी रुपयांच्या रकमेचे मूल्य ५,३५५ कोटी रुपये झाल्याचे २९ फेब्रुवारी २०१६ रोजी आढळून आले.
कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत गुंतवणुकीचे विश्लेषण केले जाणार आहे. केंद्रीय न्यासाने शेअर बाजारात रक्कम गुंतविण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये शेअर बाजारात रक्कम गुंतविण्यात आली होती.
हिंद मजदूर सभेचे सचिव आणि भविष्य निर्वाह निधीचे ट्रस्टी ए.डी. नागपाल म्हणाले की, शेअर बाजारातील गुंतवणुकीला आमचा विरोध असून, १७ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहोत.
गरीब कामगारांच्या पैशाच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)चालू वित्तीय वर्षात फेब्रुवारीपर्यंत ईपीएफओने भविष्य निधी काढून घेण्यासह १०४.३८ लाख दाव्यांचा निपटारा केला. त्यातील ९६ टक्के दावे २० दिवसांच्या आत निकाली काढण्यात आले.फेब्रुवारीत २० हजारांपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढण्यात आल्या. आता केवळ ३०८३ प्रकरणे प्रलंबित आहेत. याचा अर्थ ८२ टक्के तक्रारी केवळ सात दिवसांत निकाली काढण्यात आल्या.संघटनेच्या कारभाराचा आढावा घेताना केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त व्ही.पी. जॉय म्हणाले की, गेल्या महिन्यात कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी पेन्शन योजना १९९५ तहत सरलीकृत पेन्शन दावा फॉर्म ‘१० डी’ (यूएएन) आणि एका पानाचा पेन्शन देण्याचा आदेश (पीपीओ) चेही अनावरण करण्यात आले.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या काळात १०४.३८ लाख दावे निकाली काढण्यात आले. त्यातील ४० टक्के दावे तीन दिवसांत, ७८ टक्के दहा दिवसांत याचप्रमाणे ९६ टक्के दावे २० दिवसांत निकाली काढण्यात आले.
भविष्य निर्वाह निधीला झळ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने शेअर बाजारात गेल्यावर्षी गुंतविलेल्या रकमेवर नकारात्मक रिटर्न मिळाले आहेत. भविष्य निर्वाह निधीची ५,९२० कोटी रुपयांची रक्कम गुंतविण्यात आली होती
By admin | Updated: March 12, 2016 03:39 IST2016-03-12T03:39:34+5:302016-03-12T03:39:34+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने शेअर बाजारात गेल्यावर्षी गुंतविलेल्या रकमेवर नकारात्मक रिटर्न मिळाले आहेत. भविष्य निर्वाह निधीची ५,९२० कोटी रुपयांची रक्कम गुंतविण्यात आली होती
