Lokmat Money > बिझनेस न्यूज > लोकवर्गणीतून भांडवलाची उभारणी

लोकवर्गणीतून भांडवलाची उभारणी

घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे ही गोष्ट भारतीयांना नवीन नाही. या सार्वजनिक वर्गणीचं आॅनलाइन स्वरूप

By admin | Updated: February 14, 2016 02:41 IST2016-02-14T02:41:39+5:302016-02-14T02:41:39+5:30

घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे ही गोष्ट भारतीयांना नवीन नाही. या सार्वजनिक वर्गणीचं आॅनलाइन स्वरूप

Fundraising through Public Debt | लोकवर्गणीतून भांडवलाची उभारणी

लोकवर्गणीतून भांडवलाची उभारणी

(स्मार्ट-स्टार्ट)

- कुणाल गडहिरे

घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे ही गोष्ट भारतीयांना नवीन नाही. या सार्वजनिक वर्गणीचं आॅनलाइन स्वरूप म्हणजेच क्राउड फंडिंग. आज जगभरातील गरजू विद्यार्थी, कलाकार, फिल्म मेकर्स, सामाजिक संस्था आणि स्टार्ट अप्सनासुद्धा क्राउड फंडिंग आर्थिक पाठबळ देत आहे.

तुमच्याकडे बिझनेसची भन्नाट आयडिया आहे, तुमचं प्रोडक्ट तयार आहे. पण आवश्यक असणारी आर्थिक गुंतवणूक मात्र नाही. प्रयत्न करूनही बँकांकडून कर्ज किंवा व्यावसायिक गुंतवणूक मिळत नाही आहे. अशा वेळी त्या प्रोडक्टचा प्रात्यक्षिक देणारा व्हिडीओ, तुमची आणि तुमच्या प्रोडक्टच्या संकल्पनेची संपूर्ण माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध केली जाते आणि प्रोडक्टचं व्यावसायिक उत्पादन करण्यापूर्वीच ते हजारो लोकांना विकून तुमच्या बिझनेससाठी भांडवल उभं केलं जातं.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे, प्रणोती नगरकर आणि रिषी कुमार या भारतीय जोडप्याने बनवलेलं रोटीमॅटिक हे पूर्णपणे आॅटोमॅटिक पोळ्या बनवणारं मशिन. एका मिनिटात एक पोळी बनवणाऱ्या या मशिनचा पोळ्या बनवतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. जगाच्या पाठीवर सर्व प्रमुख प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली. हा व्हिडीओ पाहताक्षणीच, अनेक ग्राहक या मशिनसाठी उत्सुक होते. या जोडप्याने क्राउड फंडिंगच्या माध्यमातून त्यांनी, हे मशिन व्यावसायिक उत्पादन करण्यापूर्वीच विकून सुरुवातीच्या भांडवलाची उभारणी केली . पहिल्याच आठवड्यात उत्पादनपूर्व विक्रीतून त्यांनी ५ लाख डॉलर्स जमवले.
आज किकस्टार्टर, इंडीगोगो, पिक वेंचर यासारख्या अनेक वेबसाइट फक्त क्राउड फंडिंगसाठी सुरू झालेल्या आहेत. जगभरात अशा प्रकारच्या ४५० हून जास्त वेबसाइट आहेत. भारतात ही संख्या फक्त १५ आहे. फंडिंग मिळवताना स्टार्ट अप्सना अनेक अटींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे त्यांच्याकडून फंडिंग मिळवणे हे प्रत्येक स्टार्ट अपला शक्य होत नाही. तर अनेक वेळा स्टार्ट अप्सना मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत योग्य मार्गाने पोहोचता येत नाही.
जगभरात क्राउड फंडिंग हे आता एक स्वतंत्र उद्योग क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे. विविध देशांतील सरकारी पातळींवरसुद्धा, या क्षेत्रात होत असलेल्या आर्थिक उलाढालीची अधिकृत दखल घेण्यात आली आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीचे कायदेशीर नियमन व्हावे यासाठी भारताने सेबीच्या माध्यमातून नियमावली बनवणे सुरू केले आहे.

सेबीच्या प्रस्तावित नियमावलीतील ठळक मुद्दे
व्याख्या : वेबसाइट अथवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कामासाठी, व्यवसाय-उद्योगासाठी, प्रोजेक्टसाठी छोट्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून आर्थिक भांडवलाची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला क्राउड फंडिंग मानण्यात येईल.
कंपनीची भारतात अधिकृत नोंदणी झालेली असावी, मात्र शेअर मार्केटमध्ये नोंद झालेली नसावी. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून कंपनीला १० कोटींपेक्षा जास्त भांडवलाची उभारणी करता येणार नाही.
भांडवल उभारताना एका आर्थिक वर्षात २०० पेक्षा जास्त गुंतवणूकदार घेता येणार नाहीत.
या माध्यमातून भांडवलाची उभारणी करत असल्याबद्दल, जाहीररीत्या कोणत्याही प्रकारची जाहिरात करता येणार नाही. सोशल मीडियावर जाहिरात करण्यास मनाई असेल.
इक्विटी क्राउड फंडिंग आणि डेब्ट (कर्ज) क्राउड फंडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांकडे कंपनी नियमांप्रमाणे अनुक्रमे इक्विटी शेअर होल्डर आणि डिबेंचर होल्डरचे संबंधित अधिकार असतील.

फंडिंगचे
प्रकार
भागभांडवल : कंपनीच्या भागभांडवलाच्या मोबदल्यात छोट्या गुंतवणूकदारांकडून भांडवलाची उभारणी केली जाते.
मदत : लोकांकडून प्रामुख्याने सामाजिक अथवा वैयक्तिक उपयोगासाठी (उदा : शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा विशिष्ट कामासाठी मदत) पैसे जमवले जातात. पैसे देणाऱ्यांना यातून थेट आर्थिक मोबदला मिळत नाही.
कर्ज : कोणत्याही प्रकारच्या उपयोगासाठी कर्जाच्या स्वरूपात पैसे जमवले जातात. हे पैसे व्याजदराने आधीच ठरलेल्या अटींप्रमाणे परत करतात. रंग दे संस्था वेबसाइटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब उद्योजकांना उद्योग, स्वयंरोजगारासाठी अशा प्रकारे मदत करते.
मोबदला अथवा विक्री : गुंतवणूकदारांना ते किती गुंतवणूक करत आहेत त्यानुसार निश्चित मोबदला देण्यात येतो. पूर्वविक्री करताना याचा वापर जास्त होतो.

Web Title: Fundraising through Public Debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.