शक्तिप्रदर्शन : व्यावसायिकांचा कुटुंबीयांसह सहभाग
नाशिक : सराफ व्यावसायिकांनी २९ दिवसांच्या आंदोलनानंतर शहरातून बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात निवेदन दिले. सराफांनी बी. डी. भालेकर मैदानापासून काढलेल्या मोर्चामध्ये कुटुंबीयासमवेत सहभाग घेत शक्तिप्रदर्शन केले. मात्र सीबीएस चौकातील शेतकरी महासभेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे सराफांनी मेहेर सिग्नलपासूनच शांततेत व शिस्तबद्धरीत्या मोर्चा माघारी वळवला.
मोर्चा मेहेर चौकातूनच मागे फिरवण्यात आल्याने सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांच्यासह, गिरीश टकले, राजेंद्र दिंडोरकर, संजय दंडगव्हाळ, गिरीश नवसे, राहुल महाले, राजेंद्र शहाणे, रमेश वडनेरे आदिंनी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन सराफांच्या मागण्यांसंदर्भातील निवेदन दिले. या मोर्चात सराफ व्यावसायिकांनी त्यांच्या कुटुंबीयांसह सहभाग घेऊन सराफ असोसिएशनतर्फे शक्तिप्रदर्शन करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून अबकारी कर हटविण्याची मागणी केली. महिला सुवर्णकार वंदना शहाणे, रंजना महालकर, शकुंतला नागरे, सुरेखा लोळणे, कल्पना ओढेकर आदिंनीही मोर्चात सहभाग घेत सरकार विरोधात घोषणा दिल्या. अबकारी कराच्या विरोधात सुवर्णकार आपल्या भूमिकेवर ठाम असून केंद्र सरकारने हा कर रद्द क रण्याचा निर्णय जाहीर करेपर्यंत सराफांचे आंदोलन अशाच प्रकारे शांततापूर्ण मार्गाचा अवलंब करून सुरूच राहणार असल्याचे असोसिशनतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, सराफ बाजारात आल्यानंतर येथे महाआरती करून मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.(प्रतिनिधी)
इन्फ ो-
मोर्चाच्या पूर्वनियोजित मार्गात बदल
सराफ असोसिएशनने बी. डी. भालेकर मैदानापासून टिळकपथ, एम.जी. रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, शालिमार चौकातून सराफ बाजार या मार्गाने मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र शेतकरी महासभेच्या आंदोलनामुळे सराफांना सीबीएस चौकातील शेतकरी महासभेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे मेहेर सिग्नलपासूनच मोर्चा माघारी वळवावा लागला. त्यामुळे सुवर्णकार व्यावसायिकांनी पूर्वनियोजित मार्गात बदल करून शांततापूर्ण व शिस्तबद्धरीत्या मोर्चा माघारी वळवला.
नाशकात सराफ ांचा अबकारी कराविरोधात मोर्चा
शक्तिप्रदर्शन : व्यावसायिकांचा कुटुंबीयांसह सहभाग
By admin | Updated: March 30, 2016 23:54 IST2016-03-30T23:32:32+5:302016-03-30T23:54:52+5:30
शक्तिप्रदर्शन : व्यावसायिकांचा कुटुंबीयांसह सहभाग
