पुणे : ई मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. या तपासात ‘लोकमत’च्या हाती लागलेले फसवणूक करणाऱ्यांचे स्टेट बँक आॅफ इंडियामधील (एसबीआय) खाते गोठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने दिली.
बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत फोन, एसएमएस करून फसवणुकीची अनेक प्रकरणे उजेडात येत असतानाच या फसवणुकीसाठी ई-मेलचाही वापर केला जात असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. त्यावरून आॅनलाईन पद्धतीने हजारोंचा गंडा घालणाऱ्या टोळ्या देशात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फसवणुकीसाठी आलेल्या ई मेलद्वारे कशी फसवणूक केली जाते याचा तपास ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला. त्यासाठी फसवणूक करणाऱ्या कंपनींच्या व्यक्तीकडून मोबाईल क्रमांक आणि मागितलेले पैसे भरण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक मागितला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने मणिपूर राज्यातील एसबीआय बँकेचा खातेक्रमांक दिला होता. ही माहिती ‘लोकमत’ने सायबर क्राईम विभागाला दिली. त्याचा तपास करताना एसबीआयमधील हे खाते फ्रीज करण्यात येणार असल्याचे सायबर क्राईम विभागाच्या पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी ज्या बँकेच्या खात्यांमध्ये पैसे भरण्यासाठी क्रमांक दिले जातात, त्या बहुतांशी बँका या अशा दुर्गम भागातील असतात. त्यामुळे त्यांचा तातडीने शोध घेणे शक्य होत नाही. तरीही अशी बँक खाती तातडीने गोठवण्याचे प्रयत्न आम्ही करतो. त्यानुसार मिळलेले एसबीआयचे बँक खाते गोठविण्यात येईल.
आॅनलाईन फसवणुकीत वापरलेले बँक खाते गोठविणार
ई मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांचा
By admin | Updated: June 24, 2015 23:50 IST2015-06-24T23:50:41+5:302015-06-24T23:50:41+5:30
ई मेलद्वारे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ‘लोकमत’ने फर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांचा
