Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘हाईक’कडून मोफत संपर्काची सुविधा

‘हाईक’कडून मोफत संपर्काची सुविधा

दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हस्ती सुनील मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांच्या नेतृत्वाखालील ‘हाईक’ मेसेंजरने शुक्रवारी एक मोफत ‘समूह संपर्क’ सुविधा उपलब्ध करून दिली

By admin | Updated: September 12, 2015 03:35 IST2015-09-12T03:35:53+5:302015-09-12T03:35:53+5:30

दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हस्ती सुनील मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांच्या नेतृत्वाखालील ‘हाईक’ मेसेंजरने शुक्रवारी एक मोफत ‘समूह संपर्क’ सुविधा उपलब्ध करून दिली

Free contact support from 'hike' | ‘हाईक’कडून मोफत संपर्काची सुविधा

‘हाईक’कडून मोफत संपर्काची सुविधा

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हस्ती सुनील मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांच्या नेतृत्वाखालील ‘हाईक’ मेसेंजरने शुक्रवारी एक मोफत ‘समूह संपर्क’ सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार १०० लोकांशी मोफत संपर्क होऊ शकेल.
ही सुविधा अँड्रॉईडवर ४-जी आणि वायफायवर कार्यान्वित असेल. वर्ष अखेरीस ही सुविधा आयओएस आणि विंडोज यांच्या कक्षेत आणली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. ‘ओव्हर दी टॉप’(ओटीटी) द्वारे व्हाईस कॉलिंग सुविधा उपलब्ध करून देण्यावरून दूरसंचार आणि इंटरनेट कंपन्यांत वादाचा विषय बनला असताना ‘हाईक’ने ही नवीन सुविधा आणली आहे. दूरसंचार विभागाने (डीओटी) नेट तटस्थतेवरील आपल्या अहवालात ओटीटी शाखांद्वारे पेश केल्या जाणाऱ्या ‘व्हाईस कॉलिंग’ सुविधेला या नियमातहत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘हाईक’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘समूह कॉलिंग’च्या सुविधेसोबतच हाईकने व्हाईस ओव्हर इंटरनेटवरूनही (व्हीओआयपी) बीटा टॅग काढून टाकला आहे.
या नवीन सुविधेमुळे एक बटन दाबताच १०० लोकांशी आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी कोणतीही पिन, क्रमांक डायल करण्याची गरज नाही. समूहात संपर्क साधण्याची इतकी सोपी सुविधा कधीही उपलब्ध नव्हती, असे हाईक मेसेंजरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी केविन भारती मित्तल म्हणाले.

Web Title: Free contact support from 'hike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.