Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक : सूर्यवंशी

आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक : सूर्यवंशी

कोपार्डे : लोकप्रतिनिधी नसताना आपण कोट्यवधीचा निधी आणला आहे असे सांगत माजी आमदार पी. एन. पाटील यांनी, तर विद्यमान आमदारांनी केवळ विकासाच्या गप्पा मारत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शेकाप-जनसुराज्यचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:11+5:302014-10-04T22:55:11+5:30

कोपार्डे : लोकप्रतिनिधी नसताना आपण कोट्यवधीचा निधी आणला आहे असे सांगत माजी आमदार पी. एन. पाटील यांनी, तर विद्यमान आमदारांनी केवळ विकासाच्या गप्पा मारत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शेकाप-जनसुराज्यचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.

Fraud fraud of former MLAs: Suryavanshi | आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक : सूर्यवंशी

आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक : सूर्यवंशी

पार्डे : लोकप्रतिनिधी नसताना आपण कोट्यवधीचा निधी आणला आहे असे सांगत माजी आमदार पी. एन. पाटील यांनी, तर विद्यमान आमदारांनी केवळ विकासाच्या गप्पा मारत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शेकाप-जनसुराज्यचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.
शेळकेवाडी, वाशी, आमशी (ता. करवीर) येथे प्रचार व संपर्क दौर्‍यात ते बोलत होते. यावेळी शेळकेवाडीच्या सरपंच वनिता शेळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्यवंशी पुढे म्हणाले, दोघेही सांगतात आपण करवीरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी नसताना १५ कोटी पी. एन. पाटील यांना कोणी दिले व कोठे खर्च केले? एक वर्षात आपण कोट्यवधीचा निधी आणला आहे असे सांगणारे पी. एन. पाटील मागील चार वर्षांत कोठे होते? टोल, ऊसदर आंदोलनावेळी जनतेबरोबर राहण्याऐवजी त्यांनी आमची खिल्ली उडवली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आमदार नरके यांनीही संस्थेच्या माध्यमातून जनतेला झुलवत ठेवले आहे. विकासाच्या केवळ गप्पा मारणे एवढाच धंदा या आजी-माजी आमदारांचा आहे. त्यामुळे आजच्या घडीला एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी शेळकेवाडी येथे सरपंच वनिता शेळके व ग्रामपंचायत महिला सदस्यांसह गावातील महिला ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. वाशी-आमशी येथे प्रचार फेरीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला.

फोटो - मेल
ओळी - प्रचार दौरा व स्वच्छता मोहिमेचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले. शेळकेवाडी (ता. करवीर) येथे राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्रचारफेरी काढली.

Web Title: Fraud fraud of former MLAs: Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.