Lokmat Money > बिझनेस न्यूज > फोर-जीचे खोदकाम बंद करा! महापौरांचे निर्देश; सभा पुन्हा स्थगित प्रभारी आयुक्त, उपायुक्तांची सभेकडे पाठ

फोर-जीचे खोदकाम बंद करा! महापौरांचे निर्देश; सभा पुन्हा स्थगित प्रभारी आयुक्त, उपायुक्तांची सभेकडे पाठ

अकोला : फोर-जीसाठी रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मंगळवारी प्रशासनाला दिलेत. सात दिवसांच्या आत फोर-जी कराराची माहिती सादर करण्यासोबत सर्वसाधारण सभा स्थगित करीत असल्याचे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले. याव्यतिरिक्त उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या निलंबनासाठी आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभासुद्धा स्थगित करीत असल्याचे त्यानी नमूद केले.

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:34+5:302014-12-02T23:30:34+5:30

अकोला : फोर-जीसाठी रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मंगळवारी प्रशासनाला दिलेत. सात दिवसांच्या आत फोर-जी कराराची माहिती सादर करण्यासोबत सर्वसाधारण सभा स्थगित करीत असल्याचे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले. याव्यतिरिक्त उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या निलंबनासाठी आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभासुद्धा स्थगित करीत असल्याचे त्यानी नमूद केले.

Four-Digging Enclosure! Mayor's instructions; Meeting again, recruited in-charge, deputy commissioner, read the meeting | फोर-जीचे खोदकाम बंद करा! महापौरांचे निर्देश; सभा पुन्हा स्थगित प्रभारी आयुक्त, उपायुक्तांची सभेकडे पाठ

फोर-जीचे खोदकाम बंद करा! महापौरांचे निर्देश; सभा पुन्हा स्थगित प्रभारी आयुक्त, उपायुक्तांची सभेकडे पाठ

ोला : फोर-जीसाठी रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मंगळवारी प्रशासनाला दिलेत. सात दिवसांच्या आत फोर-जी कराराची माहिती सादर करण्यासोबत सर्वसाधारण सभा स्थगित करीत असल्याचे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले. याव्यतिरिक्त उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या निलंबनासाठी आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभासुद्धा स्थगित करीत असल्याचे त्यानी नमूद केले.
मनपाच्या मुख्य सभागृहात स्थगित सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे निधन झाल्याने त्यांना सभागृहाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोर-जीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेता साजीद खान, भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तत्कालीन महापौर ज्यौत्स्ना गवई यांनी फोर-जीचा करार संशयास्पद असल्यामुळे कंपनीचे खोदकाम थांबवण्याचे निर्देश प्रशासनाला ऑगस्ट महिन्यात सभेत दिले होते. आजपर्यंत प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा मुद्दा गवई यांनी उपस्थित केला. मनपाने रिलायन्स कंपनीशिवाय आणखी किती कंपन्यांसोबत करार केला, याची माहिती सभागृहात देऊन फोर-जीचे काम थांबवण्याची मागणी माजी महापौर मदन भरगड, साजिद खान, दिलीप देशमुख, गजानन गवई, धनश्री अभ्यंकर यांनी लावून धरली. सभागृहात उत्तर देण्यासाठी प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर उपस्थित नसल्याने प्रशासनाच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आले नाही. प्रशासनाने २० नोव्हेंबर रोजी आयोजित सभेत पारित केलेल्या ठरावाचे इतिवृत्त अद्यापही न दिल्याने, इतिवृत्त सादर करेपर्यंत सभा स्थगित करण्याची विनंती विजय अग्रवाल यांनी केली. यावर करारानुसार फोर-जीच्या खोदकामावर देखरेखीसाठी मनपाकडून अभियंत्यांची नियुक्ती नाही तसेच करार संशयास्पद असल्याने चौकशी करून कामे थांबवण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी दिले. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या निलंबनासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा स्थगित करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Four-Digging Enclosure! Mayor's instructions; Meeting again, recruited in-charge, deputy commissioner, read the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.