मुंबई : शेअर बाजारातील समभागांप्रमाणे सोन्याच्या प्रत्यक्ष व्यवहारांसाठी बुलियन एक्सेंजच्या उभारणीने आता मूर्त रुप घेण्यास सुरुवात केली असून या दृष्टीने पहिले पाऊल शुक्रवारी पडले. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि इंडियन बुलियन ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए) या दोन संस्थांमध्ये या संदर्भात सामंजस्य करार झाला असून यामाध्यमातून हे एक्सेंज उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या वित्तीय व्यवहार विषयाचे सचिव शक्तीकांता दास यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या एक्सेजंमध्ये देशातील सोनेबाजारातील व्यवहार गतीमान होताना दिसतील.
या संदर्भात माहिती देताना आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी सांगितले की, या एक्सेंजच्या उभारणीकरिता एका स्पेशल पर्पज व्हेअिकलची स्थापना करण्यात येणार असून यामध्ये आयबीजएची हिस्सेदारी ७० टक्के तर बीएसईची हिस्सेदारी ३० टक्के इतकी असेल. बुलियन बाजारातील सर्व खरेदी व विक्रीचे व्यवहार हे या एक्सेंजच्या माध्यमातून करण्याचा मानस असून यामुळे या व्यवहारांत अधिकाधिक पारदर्शकता येईल, असे कम्बोज म्हणाले. (प्रतिनिधी)
बुलियन एक्स्चेंजची उत्साहात पायाभरणी
शेअर बाजारातील समभागांप्रमाणे सोन्याच्या प्रत्यक्ष व्यवहारांसाठी बुलियन एक्सेंजच्या उभारणीने आता मूर्त रुप घेण्यास सुरुवात केली असून या दृष्टीने पहिले
By admin | Updated: December 11, 2015 23:59 IST2015-12-11T23:59:15+5:302015-12-11T23:59:15+5:30
शेअर बाजारातील समभागांप्रमाणे सोन्याच्या प्रत्यक्ष व्यवहारांसाठी बुलियन एक्सेंजच्या उभारणीने आता मूर्त रुप घेण्यास सुरुवात केली असून या दृष्टीने पहिले
_ns.jpg)