Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘विदेशीं’नी काढले ३,५00 कोटी

‘विदेशीं’नी काढले ३,५00 कोटी

नव्या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ३,५00 कोटी रुपये काढून घेतले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेली चिंताजनक स्थिती

By admin | Updated: January 18, 2016 00:24 IST2016-01-18T00:24:02+5:302016-01-18T00:24:02+5:30

नव्या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ३,५00 कोटी रुपये काढून घेतले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेली चिंताजनक स्थिती

'Foreigners' removed 3,500 crores | ‘विदेशीं’नी काढले ३,५00 कोटी

‘विदेशीं’नी काढले ३,५00 कोटी

नवी दिल्ली : नव्या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ३,५00 कोटी रुपये काढून घेतले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेली चिंताजनक स्थिती, तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे गुंतवणूकदार बाजारातील आपला पैसा काढून घेत आहेत.
एकीकडे गुंतवणूक काढून घेतली जात असतानाच भारतीय ऋण बाजाराबाबत गुंतवणूकदारांत आशावादी वातावरण असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या काळात ३,२३९ कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूकही झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १ ते १५ जानेवारी या काळात शेअर बाजारातून ३६,३६८ कोटी रुपये गुंतविले. त्याबरोबर या काळात ३९,८५२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. याचाच अर्थ या १५ दिवसांच्या काळात ३,४८३ कोटींची शुद्ध गुंतवणूक काढण्यात आली. विदेशी गुंतवणूकदारांकडून केली जाणारी गुंतवणूक अत्यंत अस्थीर स्वरूपाची असते.

Web Title: 'Foreigners' removed 3,500 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.