मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात देशातील परकीय गुंतवणुकीत ३७ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असून, सुमारे ३९ अब्ज ३२ कोटी अमेरिकी डॉलर इतकी नवी गुंतवणूक भारतात आली आहे.
‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रियल पॉलिसी अॅण्ड प्रमोशन’कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही परकीय गुंतवणूक प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र, ट्रेंडिग व्यवसाय, वाहन उद्योग, औषधनिर्मिती, रसायन उद्योगात झाली आहे. देशात गुंतवणूक करण्यामध्ये सिंगापूरचा क्रमांक प्रथम आहे, तर त्यापाठोपाठ मॉरिशस, अमेरिका, नेदरलँडस्, जपान आदी देशांचा क्रमांक आहे. परकीय गुंतवणूक येण्याचा मार्ग सुलभ करतानाच गुंतवणूक आल्यानंतर संबंधित कंपन्यांना आवश्यक त्या परवानग्या आणि सेट-अप करण्यासाठी सुसह्य सेवा देण्यासाठी सरकारने प्राधान्याने काम सुरू केल्यामुळे परकीय गुंतवणुकीचा आकडा वाढत असल्याचे मत डीआयपीपीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उपलब्ध आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०१५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत झालेल्या परकीय गुंतवणुकीत ३७ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
परकीय गुंतवणुकीत ३७ टक्के वाढ
गेल्या आर्थिक वर्षात देशातील परकीय गुंतवणुकीत ३७ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असून, सुमारे ३९ अब्ज ३२ कोटी अमेरिकी डॉलर इतकी नवी गुंतवणूक भारतात आली आहे.
By admin | Updated: April 21, 2016 03:42 IST2016-04-21T03:42:41+5:302016-04-21T03:42:41+5:30
गेल्या आर्थिक वर्षात देशातील परकीय गुंतवणुकीत ३७ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असून, सुमारे ३९ अब्ज ३२ कोटी अमेरिकी डॉलर इतकी नवी गुंतवणूक भारतात आली आहे.
