Lokmat Money > बिझनेस न्यूज > परकीय गंगाजळी उच्चांकावर

परकीय गंगाजळी उच्चांकावर

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या किमतीत झालेला चढ-उतार आणि तेलाच्या किमतीमुळे आयात खर्चात झालेली परकीय चलनाची बचत

By admin | Updated: June 19, 2015 23:16 IST2015-06-19T23:16:03+5:302015-06-19T23:16:03+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या किमतीत झालेला चढ-उतार आणि तेलाच्या किमतीमुळे आयात खर्चात झालेली परकीय चलनाची बचत

Foreign exchange reserves | परकीय गंगाजळी उच्चांकावर

परकीय गंगाजळी उच्चांकावर

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या किमतीत झालेला चढ-उतार आणि तेलाच्या किमतीमुळे आयात खर्चात झालेली परकीय चलनाची बचत यामुळे भारताच्या परकीय गंगाजळीने ३५४ अब्ज अमेरिकी डॉलरचा नवा उच्चांक गाठला आहे.
१२ जून रोजी संपलेल्या आठवड्यातील परकीय गंगाजळीच्या स्थितीचा ताळेबंद भारतीय रिझर्व्ह बँकेने सादर केला असून यानुसार, देशाच्या परकीय गंगाजळीत एक महिन्याच्या कालावधीत एक अब्ज ७५ कोटी अमेरिकी डॉलर इतकी भरीव वाढ होत या साठ्याने नव्या उच्चांकाला स्पर्श केला आहे.
परकीय चलनाच्या साठ्यात झालेली वाढ ही सलग तिसऱ्या महिन्यात झालेली वाढ असून गेल्या पाच वर्षांतील हा देखील एक नवा उच्चांक आहे. वास्तविक गेल्या महिनाभरात रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचे दर हे चढ्या भावातच होते; परंतु जेव्हा जेव्हा अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६४ रुपयांची पातळी गाठली, त्या प्रत्येक वेळी रिझर्व्ह बँकेने
पुढाकार करत डॉलरच्या खरेदी-विक्रीत हस्तक्षेप केल्याने त्याचा फायदा किंमत स्थिर राखण्यात झाला असल्याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञांनी केले आहे.
सरकारी तिजोरीतील सोन्याचा साठाही १९ अब्ज ३४ कोटी अमेरिकी डॉलरच्या समाधानकारक पातळीवर असल्याचे शिखर बँकेने नमूद केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, त्याचा परिणाम गंगाजळीत दिसून येत आहे. (प्र्रतिनिधी)

- देशाच्या एकूण परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये अमेरिकी डॉलरचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजघडीच्या आयातीचे बहुतांश व्यवहार हे अमेरिकी डॉलरमध्ये होत असल्याने परकीय चलनात अमेरिकी डॉलरचे वाढते प्रमाण हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे, तर पौंड आणि युरो या दोन्ही चलनांचे साठेही मजबूत असल्याचा निर्वाळा भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

Web Title: Foreign exchange reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.