नवी दिल्ली : विदेशातील बँक खाती किंवा संपत्तीसंदर्भात कर विवरणपत्रात ज्यांनी माहिती दिली आहे, अशा कर विवरणपत्राची उत्पन्न कर विभाग (आयटी) अत्यंत बारकाईने तपासणी करणार आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्याआधी (३१ मार्च) हे तपासणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निर्देशातहत अशा कर विवरणपत्राची बारकाईने शहानिशा करण्याचे काम आयकर विभागाने सुरू केले आहे. विदेशातील संपत्तीशी संबंधित सर्व प्रकरणांची मार्चअखेर तपासणी केली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २०१२-१३ मध्ये आयकर विवरण पत्रात एक नवा तक्ता दिला होता. यात सर्व वैयक्तिक आयकरदाते व संस्थासाठी कर आकलनासाठी विदेशातील संपत्तीची माहिती देण्याचे बंधनकारक केले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
विदेशातील संपत्ती; आयकरची नजर
विदेशातील बँक खाती किंवा संपत्तीसंदर्भात कर विवरणपत्रात ज्यांनी माहिती दिली आहे, अशा कर विवरणपत्राची उत्पन्न कर विभाग (आयटी) अत्यंत बारकाईने तपासणी करणार आहे.
By admin | Updated: March 22, 2015 23:51 IST2015-03-22T23:51:15+5:302015-03-22T23:51:15+5:30
विदेशातील बँक खाती किंवा संपत्तीसंदर्भात कर विवरणपत्रात ज्यांनी माहिती दिली आहे, अशा कर विवरणपत्राची उत्पन्न कर विभाग (आयटी) अत्यंत बारकाईने तपासणी करणार आहे.
