Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘व्हिस्टारा’ला फ्लाइंग परमिट

‘व्हिस्टारा’ला फ्लाइंग परमिट

परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी आता भारतात प्रवासी विमान वाहतूक करू शकेल.

By admin | Updated: December 17, 2014 00:50 IST2014-12-17T00:50:23+5:302014-12-17T00:50:23+5:30

परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी आता भारतात प्रवासी विमान वाहतूक करू शकेल.

Flying Permit to 'Whistara' | ‘व्हिस्टारा’ला फ्लाइंग परमिट

‘व्हिस्टारा’ला फ्लाइंग परमिट

नवी दिल्ली : टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या व्हिस्टारा या नव्या विमान कंपनीला भारत सरकारच्या अखत्यारीतील नागरी उड्डयन महासंचालकांनी (डीजीसीए) एअर आॅपरेटर परमिट म्हणजेच उड्डाण परवाना दिला आहे.
परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी आता भारतात प्रवासी विमान वाहतूक करू शकेल. या कंपनीत टाटा सन्सचे ५१ टक्के समभाग आहेत. उरलेले ४९ टक्के समभाग सिंगापूर एअरलाइन्सचे आहेत. व्हिस्टारा ही देशातील तिसरी फूल सर्व्हिस कॅरिअर ठरली आहे. एअर इंडिया आणि जेट एअरवेज या दोन कंपन्या आधीपासून फूल सर्व्हिस कॅरिअर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचे हेडकॉर्टर दिल्लीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Flying Permit to 'Whistara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.