Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंगळूर ते गोवा विमानप्रवास करा फक्त ९९० रूपयात!

बंगळूर ते गोवा विमानप्रवास करा फक्त ९९० रूपयात!

एअर एशिया इंडिया कंपनी ही सेवा अंमलात आणणार असून बंगळूर ते गोवा विमानप्रवास केवळ ९९० रूपयात करता येणार आहे.

By admin | Updated: May 30, 2014 15:27 IST2014-05-30T15:16:58+5:302014-05-30T15:27:45+5:30

एअर एशिया इंडिया कंपनी ही सेवा अंमलात आणणार असून बंगळूर ते गोवा विमानप्रवास केवळ ९९० रूपयात करता येणार आहे.

Fly from Bangalore to Goa, just 99 rupees! | बंगळूर ते गोवा विमानप्रवास करा फक्त ९९० रूपयात!

बंगळूर ते गोवा विमानप्रवास करा फक्त ९९० रूपयात!

>ऑनलाइन टीम 
चेन्नई, दि. ३० - मध्यमवर्गीयांचे विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहेत. एअर एशिया इंडिया कंपनी ही सेवा अंमलात आणणार असून बंगळूर ते गोवा विमानप्रवास केवळ ९९० रूपयात करता येणार आहे. ही सेवा येत्या १२ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती एअर एशिया इंडिया कंपनीचे सीईओ मित्तू चांदलिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
A320 क्रमांकाचे विमान १२ जूनपासून बंगळूरूहून रोज गोव्यासाठी उड्डान करेल. एअर एशिया इंडिया , एअर एशिया, टाटा सन्स आणि अरूण भाटीया टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस यांना हवाई वाहतूकीच्या डीजीसीएने ९ महिन्यांच्या कालावधीनंतर उड्डान करण्याची परवानगी दिली आहे. आज सायंकाळपासून ९.३० पर्यंत या वेळेत बुकींग करता येणार आहे. देशातील सर्वांना विमान प्रवास करण्याची संधी मिळता यावी यासाठी हा आमचा प्रयत्न असून हे वित्त वर्ष असल्याने देशातील १० शहरात १० विमान सेवा सुरू करण्याचे आमचे ध्येय असल्याची माहिती चांदलिया यांनी दिली. आमच्याकडे सध्या ३०० लोक प्रवासासाठी सज्ज झाले असून एका वेळी विमानात ८० लोक प्रवास करू शकणार आहेत असे चांदलिया म्हणाले. 

Web Title: Fly from Bangalore to Goa, just 99 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.