मुंबई : सलग सात दिवसांच्या घसरणीला लगाम लावत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १.०६ अंकांनी वधारला असला तरी भौगोलिक आणि राजकीय तणावामुळे शेअर बाजार चढ-उताराच्या हिंदोळ्याने हेलकावे घेत राहिला. एकूणच आठवडाअखेर सेन्सेक्स आणि निफ्टीत फारशी सुधारणा झाली नाही.
शुक्रवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) १.०६ अंकांनी वधारत २७,४५८.६४ वर स्थिरावला. तथापि, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ०.७५ अंकांनी घरंगळत ८,३४१.४० अंकावर तग धरून राहिला.
एप्रिल महिन्यातील वायदे व्यवहाराची सुरुवात झाल्याने मुंबई शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. तथापि, मध्य-पूर्वमधील वाढता तणाव आणि नफेखोरीमुळे बाजारात घसरण पाहावयास मिळाली. मध्यंतरात सेन्सेक्स २७,६९४.४१ आणि २७,२४८.४५ अंकादरम्यान हेलकावे घेत दिवसअखेर २७,४५८.६४ वर स्थिरावला. आधीच्या सलग सात सत्रात सेन्सेक्स १,२७८.८० अंकांनी घसरला. काल गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स ६५४.६५ अंकांनी गडगडला होता.मध्य-पूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपीय आणि आशियाई बाजारात नकारात्मक वातावरण होते. प्राथमिक आकडेवारीनुसार काल गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी ५२१.२३ कोटींची शेअर्स विकले.
४एप्रिल महिन्यासाठी नवीन वायदे व्यवहाराची सुरुवात झाल्याने आयटी, धातू, बँकिंग, आॅटो आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील शेअर्सची खरेदी झाली. परिणामी सेन्सेक्सला सकारात्मक पातळी राखता आली. तथापि, मोठ्या प्रमाणावर नफेखोरी झाल्याने बाजार हिंदोळे घेत राहिला.
४या चढ-उताराच्या हेलकाव्याचा भारती एअरटेलच्या शेअर्सला फटका बसला. स्पेक्ट्रम खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे ओतणार असल्याच्या भीतीने भारती एअरटेलचे शेअर्स ५.६४ टक्क्यांनी घसरले.
बाजारात चढ-उताराचे हेलकावे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १.०६ अंकांनी वधारला असला तरी भौगोलिक आणि राजकीय तणावामुळे शेअर बाजार चढ-उताराच्या हिंदोळ्याने हेलकावे घेत राहिला.
By admin | Updated: March 27, 2015 23:40 IST2015-03-27T23:40:02+5:302015-03-27T23:40:02+5:30
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १.०६ अंकांनी वधारला असला तरी भौगोलिक आणि राजकीय तणावामुळे शेअर बाजार चढ-उताराच्या हिंदोळ्याने हेलकावे घेत राहिला.
