जल्हाधिकारी मुंढे: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची यादी वेबसाईटवर टाकणार सोलापूर: लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारींची वेळेत दखल घ्या, आजवर प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारी 14 डिसेंबरपर्यंत सोडवा असे आदेश सर्व विभागांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ लोकाभिमुख प्रशासन होण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभाथर्र्ींची यादी 1 जानेवारीपर्यंत वेबसाईटवर टाकणार असल्याचे मुंढे म्हणाल़े सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आपापल्या स्तरावरील नागरिकांचे प्रश्न, तक्रारी सोडविण्याबाबत आढावा बैठका घ्याव्यात़ परिणामकारक प्रकरणे हाताळावीत अशा सूचना सर्व अधिकार्यांना दिल्याचे मुंढे यांनी सांगितल़े जुन्या 33 तक्रारी आहेत़ सर्वात जुन्या म्हणजे जानेवारी 2013 मध्ये दाखल झालेल्या 23 तक्रारी आहेत या सर्व प्रलंबित तक्रारींवर तातडीने निर्णय घ्यावेत असे आदेश मुंढे यांनी दिल़े चौकट़़़10 तक्रारी अन् 77 निवेदने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनात 10 तक्रारी आणि 77 निवेदने प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली़ यातील एका तक्रारीचा निपटारा करण्यात आला आह़े लोकशाही दिनात महसूल (3), गौण खनिज शाखा (1), दुय्यम चिटणीस गृह (1), भूसंपादन (2), जिल्हा परिषद (1), जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (1 ) आणि पोलीस अधीक्षक कार्यालय (1) अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत़ विविध विभागाकडील 77 निवेदने दाखल झाली असून, यात महसूल विभागाची 29 निवेदने असल्याचे मुंढे म्हणाल़ेचौकट़़़लाभाथर्र्ींची यादी वेबसाईटवरसंजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभाथर्र्ींची यादी येत्या 1 जानेवारीपर्यंत वेबसाईटवर टाकण्यात येतील तसेच ती यादी नंतर आधार कार्डला लिंक करण्यात येईल असा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल़े यामुळे पारदर्शकता येईल, शिवाय लाभार्थी कोण आहेत हे देखील सर्वांना कळेल असे मुंढे म्हणाल़े शासकीय कार्यालये आतून आणि बाहेरुन सुधारली पाहिजेत त्यानुसार अधिकार्यांना सूचना दिल्या असून मी स्वत: कार्यालये तपासणार असल्याचे मुंढे म्हणाल़ेचौकट़़लोकशाही दिनाचा फार्ससर्वसामान्यांच्या तक्रारींची थेट जिल्हाधिकार्यांनी दखल घेऊन त्या सोडवाव्यात अशी लोकशाही दिनाची संकल्पना आहे; मात्र नव्या आदेशानुसार नागरिकांना आता 15 दिवस अगोदर तक्रार दाखल करावी लागते त्यामुळे याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आह़े लोकशाही दिनात कमी तक्रारी आणि जास्त निवेदने अशी स्थिती आह़े त्या-त्या तक्रारी पुन्हा पुन्हा आहेत़ सात-बारा मिळत नाही, वीज कनेक्शन दिले जात नाही, वहिवाटीचा रस्ता नाही, जागेवरील अतिक्रमण या तक्रारी पुन्हा पुन्हा आहेत मात्र त्या सुटल्या नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वारंवार लोकशाही दिनात हेलपाटे मारावे लागतात़
लोकशाही दिनातील तक्रारी वेळेत सोडवा
जिल्हाधिकारी मुंढे: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची यादी वेबसाईटवर टाकणार
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:01+5:302014-12-02T00:36:01+5:30
जिल्हाधिकारी मुंढे: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची यादी वेबसाईटवर टाकणार
