वाशिम : औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात विदर्भ व मराठवाडा भागातील उद्योग टिकून राहावे, याकरिता या भागातील सर्व उद्योग घटकांना वीज बिलात विद्युत शुल्क माफीची सवलत आणखी पाच वर्षे लागू राहणार आहे.
उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ व मराठवाडा भाग औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्याचा सर्वांगिण विकास साध्य होण्याकरिता आधी विदर्भ व मराठवाड्याचा औद्योगिक विकास होणे आवश्यक आहे. त्याकरिता तेथील उद्योग स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी ते सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाच्या उद्योग ,ऊर्जा व कामगार विभागाने १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१४ पर्यत विदर्भ व मराठवाड्यातील सर्व उद्योगघटकांना विद्युत शुल्क माफीची सवलत लागू केली होती. या सवलतीची मुदत ३१ मार्च २००१४ रोजी संपली होती. त्यामुळे या भागातील उद्योग घटकांना देण्यात येत असलेल्या विद्युत शुल्कमाफीच्या सवलतीस १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय उद्योग, उर्जा व कामगार विभागाने ६ जून रोजी घेतला आहे. या निर्णयानुसार विदर्भ व मराठवाड्यातील सर्व उद्योगघटकांना त्यांच्या विद्युत बिलाच्या १० ते १२ टक्के एवढ्या भराव्या लागणाऱ्या वीज शुल्क माफीची सवलत पुढील पाच वर्षे मिळणार आहे. (प्रतिनिधी)
उद्योगांच्या विद्युत शुल्कमाफीस पाच वर्षांची मुदतवाढ
औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात विदर्भ व मराठवाडा भागातील उद्योग टिकून राहावे, याकरिता या भागातील सर्व उद्योग घटकांना वीज बिलात विद्युत शुल्क माफीची सवलत आणखी पाच वर्षे लागू राहणार आहे.
By admin | Updated: June 9, 2014 04:36 IST2014-06-09T04:36:11+5:302014-06-09T04:36:11+5:30
औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात विदर्भ व मराठवाडा भागातील उद्योग टिकून राहावे, याकरिता या भागातील सर्व उद्योग घटकांना वीज बिलात विद्युत शुल्क माफीची सवलत आणखी पाच वर्षे लागू राहणार आहे.
