Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक

पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक

शेअर बाजारातील पाच दिवसांच्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५.८३ अंकांनी घसरून २८,८७९.३८ अंकांवर बंद झाला

By admin | Updated: April 11, 2015 01:19 IST2015-04-11T01:19:39+5:302015-04-11T01:19:39+5:30

शेअर बाजारातील पाच दिवसांच्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५.८३ अंकांनी घसरून २८,८७९.३८ अंकांवर बंद झाला

Five-day fast break | पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक

पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक

मुंबई : शेअर बाजारातील पाच दिवसांच्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५.८३ अंकांनी घसरून २८,८७९.३८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र सलग सहाव्या दिवशी तेजीतच होता.
फेब्रुवारीचा औद्योगिक उत्पादनाचा लेखाजोखा सादर होण्याआधी शेअर बाजारात सतर्कतेचे वातावरण दिसून आले. सेन्सेक्स सकाळी २८,८८९.२७ अंकांवर उघडला. त्यानंतर तो वर चढून २८,९0७.८१ अंकांवर पोहोचला. विदेशी संस्थांच्या खरेदीमुळे ही वाढ मिळाली होती. त्यानंतर मात्र बाजारात नफा वसुलीला ऊत आला. त्यामुळे बाजार खाली आला. २८,७५६.७५ अंकांपर्यंत तो घसरला होता. सत्र अखेरीस ५.८३ अंकांची अथवा 0.0२ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २८,८७९.३८ अंकांवर बंद झाला.
५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २0.५ टक्के अथवा 0.0२ टक्के अल्प वाढीसह ८,७८0.३५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,७८७.४0 आणि ८,७३३.६0 अंकांच्यामध्ये खालीवर होताना दिसून आला. साप्ताहिक पातळीवर पाहता दोन्ही निर्देशांक सलग दुसऱ्या सप्ताहात तेजी दर्शविताना दिसून आले. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, शेअर बाजार सध्या अतिखरेदीच्या स्थितीत आहेत. रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवूनही बाजारातील खरेदी थांबली नाही.
औषधी कंपन्यांचे समभाग पुन्हा एकदा घसरले. त्यांचा घसरणीचा हा दुसरा दिवस होता. सर्वाधिक फटका बसलेला सिप्लाचा समभाग २.६६ टक्क्यांनी खाली आला. ल्युपिनचा समभाग २.४९ टक्क्यांनी घसरला. घसरणीचा फटका बसलेल्या अन्य कंपन्यांत एचडीएफसी बँक, हिंदाल्को, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १४ कंपन्यांचे समभाग घसरले. या उलट सेसा स्टरलाईट, एसबीआय, डॉ. रेड्डीज लॅब, भारती एअरटेल, इन्फोसिस, आरआयएल, टाटा पॉवर आणि भेल या कंपन्यांचे समभाग वाढले. 

Web Title: Five-day fast break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.