लहा: नांदेड-लोहा मार्गावर कारेगावजवळ ट्रक अडवून दोघांना जबर मारहाण झाली होती़ यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर पोलिस यंत्रणेने तपासाअंती सहा जणांना शनिवारी अटक केली़ सदरील आरोपींना लोहा न्यायालयात सादर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली़ राष्ट्रीय महामार्गावर १६ जुलैच्या पहाटे तीन दूचाकीवर आलेल्या आरोपींनी मध्यप्रदेशातील प्रितमपूर येथे निघालेला मालवाहू ट्रक क्रमांक एम़पी़ ०९ एच़व्ही़ ५१६ कारेगाव पाटीजवळ अडविला़ ट्रकचालक गुलाबसिंह परमार व अर्जूनसिंह महेताब कलम रा़ परोंद ता़ पुनासा जि़ खंडवा (मध्य प्रदेश) या दोघांना जबर मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम चोरुन पोबारा केला होता़ जखमीपैकी अर्जूनसिंह कलम याचा उपचारादरम्यान नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात १८ जुलै रोजी मृत्यू झाला़ लोहा पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ तीन पथके पाठविली होती़ शिवाय स्थानिक गुन्हा शाखेकडूनही तपासाची चक्रे गतीमान करण्यात आली़ दरम्यान, १९ जुलै रोजी स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड येथून सय्यद नाजिम सय्यद खैसर, शेख लतीफ नदीम शेख महेबूब, गौतम लक्ष्मण राऊत, विकास चंद्रकांत कांबळे, शेख जुबेर मामू शेख सादीक यांच्यासह अन्य एक असे सहा जणांना अटक करुन लोहा पोलिसांच्या स्वाधीन केले़ या सर्व आरोपींना न्यायाधीश पी़यु़ कुलकर्णी यांनी २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली़ या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांनी तीन पथके स्थापन केली होती़ या पथकात पोलिस उपनिरीक्षक घोरपडे, जामोदकर, रमेश सूर्यवंशी, मुधोळकर, सोनकांबळे, टोम्पे, मुंडकर, पेदेवाड, हंबर्डे आदींचा समावेश होता़ अटक केलेल्या आरोपीपैकी एकजण अल्पवयीन गुन्हेगार असल्याने त्याची रवानगी बालन्यायालयात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली़
कारेगाव दरोडा प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची कोठडी
लोहा: नांदेड-लोहा मार्गावर कारेगावजवळ ट्रक अडवून दोघांना जबर मारहाण झाली होती़ यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर पोलिस यंत्रणेने तपासाअंती सहा जणांना शनिवारी अटक केली़ सदरील आरोपींना लोहा न्यायालयात सादर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली़
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:26+5:302015-07-19T21:24:26+5:30
लोहा: नांदेड-लोहा मार्गावर कारेगावजवळ ट्रक अडवून दोघांना जबर मारहाण झाली होती़ यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर पोलिस यंत्रणेने तपासाअंती सहा जणांना शनिवारी अटक केली़ सदरील आरोपींना लोहा न्यायालयात सादर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली़
