नवी दिल्ली : वित्तीय तूट जुलैअखेरपर्यंत वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६१.२ टक्के किंवा ३.२४ लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. २०१३-१४ च्या एप्रिल-जुलैदरम्यान वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६२.८ टक्के होती.
महालेखापाल अर्थात कॅगद्वारे शुक्रवारी जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या दरम्यान एकूण खर्च ५.०३ लाख रुपये राहिला. हा गेल्या वर्षासाठीच्या अंदाजे रकमेच्या २८.१ टक्के एवढा आहे. योजनांवरील एकूण खर्च १.३२ लाख कोटी रुपये, तर गैर-योजनांवरील खर्च ३.७१ लाख कोटी रुपये राहिला. या काळात अर्थसंकल्पीय अंदाजाच्या १४.८ टक्के वा १.७५ लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला.
कॅगच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांत वित्तीय तूट २.६६ लाख कोटी रुपयांहून अधिक किंवा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ७०.४ टक्क्यांवर राहिली. २०१३-१४ या आर्थिक वर्षात वित्तीय तूट ५.०८ लाख कोटी रुपये वा जीडीपीच्या ४.५ टक्क्यावर राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वित्तीय तूट जुलैअखेरीस बजेट अंदाजाच्या ६१.२%
वित्तीय तूट जुलैअखेरपर्यंत वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६१.२ टक्के किंवा ३.२४ लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे
By admin | Updated: August 30, 2014 03:40 IST2014-08-30T03:40:34+5:302014-08-30T03:40:34+5:30
वित्तीय तूट जुलैअखेरपर्यंत वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६१.२ टक्के किंवा ३.२४ लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे
