Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनने तयार केले पहिले इलेक्ट्रिक विमान

चीनने तयार केले पहिले इलेक्ट्रिक विमान

चीनने पहिले इलेक्ट्रिक विमान तयार केले असून ते ३,००० मीटर उंचावर उडू शकते. या विमानाच्या पंखांचा विस्तार

By admin | Updated: June 24, 2015 00:29 IST2015-06-24T00:29:51+5:302015-06-24T00:29:51+5:30

चीनने पहिले इलेक्ट्रिक विमान तयार केले असून ते ३,००० मीटर उंचावर उडू शकते. या विमानाच्या पंखांचा विस्तार

First electric plane made by China | चीनने तयार केले पहिले इलेक्ट्रिक विमान

चीनने तयार केले पहिले इलेक्ट्रिक विमान

बीजिंग : चीनने पहिले इलेक्ट्रिक विमान तयार केले असून ते ३,००० मीटर उंचावर उडू शकते.
या विमानाच्या पंखांचा विस्तार १४.५ मीटर असून ते जास्तीत जास्त २३० किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते.
या विमानाची बॅटरी जास्तीत जास्त दोन तासांत चार्ज करता येते. एकदा चार्ज केल्यानंतर हे विमान ४५ मिनिटे ते एक तासापर्यंत उडू शकते. या विमानाचा कमाल वेग १६० किलोमीटर प्रतितास एवढा आहे. शेनयांग एअरोस्पेस विद्यापीठ व लियोओनिंग जनरल अ‍ॅव्हिएशन अकादमीने हे विमान तयार केले आहे.

Web Title: First electric plane made by China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.