Lokmat Money > बिझनेस न्यूज > यशवंत स्कूलमध्ये अग्निशामनाची प्रात्यि़क्षके

यशवंत स्कूलमध्ये अग्निशामनाची प्रात्यि़क्षके

कोडोली : येथील यशवंत इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर आगीपासून संरक्षण आटोक्यात आणण्याची प्रात्याक्षिके करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिके करण्यात आली.

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:27+5:302014-12-02T23:30:27+5:30

कोडोली : येथील यशवंत इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर आगीपासून संरक्षण आटोक्यात आणण्याची प्रात्याक्षिके करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिके करण्यात आली.

Fire extinguishers in Yashwant School | यशवंत स्कूलमध्ये अग्निशामनाची प्रात्यि़क्षके

यशवंत स्कूलमध्ये अग्निशामनाची प्रात्यि़क्षके

डोली : येथील यशवंत इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर आगीपासून संरक्षण आटोक्यात आणण्याची प्रात्याक्षिके करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिके करण्यात आली.
रणभिसे यांनी प्रथम आग म्हणजे काय? आगीचे प्रकार, कोणत्या प्रकारची आग कोणत्या प्रकारच्या अग्निशामकाने विझविणे, याबाबतची माहिती दिली. कागद, लाकूड, गॅस, इंधन, इलेक्ट्रिक वस्तू तसेच मेटल या वस्तूंना आग लागल्यास ती कशा प्रकारे विझवावी या प्रकारची प्रात्याक्षिके करून दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आग लागल्यास त्यांच्या अंगावर चादर किंवा रंग ओला करून टाकल्यास आगीपासून त्या व्यक्तीचे संरक्षण कसे होते. याबाबतची डमी प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.
या प्रात्याक्षिकांमध्ये अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे यांच्यासह जवान सरदार मालदार, मंदार कांदळकर, उदय शिंदे, पवन कांबळे, संग्राम मोरे, सुनील यादव, पुंडलिक पोवार, तानाजी वडर, आदींनी सहभाग घेतला.
यावेळी व्ही. डी. पाटील, यशवंत एकनाथ पाटील, ऊर्मिला शिंदे, ए. आर. कांबळे, विश्वनाथ पाटील, दीपक जोशी, पुंडलिक पाटील, यांच्यासह विविध शाळांतील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

फोटो - मेल

ओळी - कोडोली (ता. पन्हाळा) येथे अगिनशामक दलाच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रात्याक्षिकांचे क्षण.

Web Title: Fire extinguishers in Yashwant School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.