नवी दिल्ली : बँक व्यवहारापासून अद्याप दूर असलेल्या ७.५ कोटी घरात किमान दोन खाती असावीत यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या सरकारच्या वित्तीय समावेश मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे.
मोबाईल बँकिंग प्रत्येक प्रकारच्या फोनवर उपलब्ध करण्यात येईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. ते सरकारी बँक प्रमुखांच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.
या मोहिमेची औपचारिक घोषणा पंतप्रधान करतील आणि त्यानंतर संपूर्ण देशात समावेश मोहिमेला प्रारंभ होईल. ही समावेश मोहीम विविध पातळ्यांवर राबवण्यात येईल, असेही ते म्हणाले. काही भागात शाखा उघडणे शक्य आहे. तेथे नियमित शाखा उघडण्यात येईल. जिथे शाखा उघडणे शक्य नाही तेथे एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या लहान शाखा काढण्यात येतील, असे ते म्हणाले. विविध पातळ्यांबद्दल सांगताना ते म्हणाले, त्यापुढील पातळी म्हणजे बुथ राहील आणि त्याच्याखाली एटीएम उघडण्यात येईल. त्याच्याखालील पातळी म्हणजे व्यक्तीशी बिझनेस करसपॉन्डस् संपर्क साधतील. (वृत्तसंस्था)
वित्तीय समावेश मोहीम पंतप्रधान सुरू करणार
बँक व्यवहारापासून अद्याप दूर असलेल्या ७.५ कोटी घरात किमान दोन खाती असावीत यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या सरकारच्या वित्तीय समावेश मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.
By admin | Updated: July 31, 2014 23:36 IST2014-07-31T23:36:16+5:302014-07-31T23:36:16+5:30
बँक व्यवहारापासून अद्याप दूर असलेल्या ७.५ कोटी घरात किमान दोन खाती असावीत यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या सरकारच्या वित्तीय समावेश मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.
