नवी दिल्ली : बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपनीसाठी योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ५0 लाख डॉलरचा निधी भारतात आणावा लागेल.
बांधकाम क्षेत्रासंबंधी २0१४ मध्ये जारी करण्यात आलेल्या एका प्रेस नोटवर केंद्र सरकारने आज स्पष्टीकरण जारी केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अपूर्ण योजनांतून बाहेर पडण्याची परवानगी विदेशी गुंतवणूक संवर्धन बोर्डाच्या मंजुरीनंतरच मिळेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. २0१४ मध्ये बांधकाम क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीच्या नियमांत सवलत देण्यात आली होती. १ कोटी डॉलरची गुंतवणूक मर्यादा ५0 लाख करण्यात आली होती. ही गुंतवणूक सहा महिन्यांच्या आत भारतात आणण्याची अट त्यात घालण्यात आल्याचे आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
५0 लाख डॉलर एफडीआयसाठी ६ महिनेच मुदत
बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपनीसाठी योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ५0 लाख डॉलरचा निधी भारतात आणावा लागेल.
By admin | Updated: March 13, 2015 23:43 IST2015-03-13T23:43:54+5:302015-03-13T23:43:54+5:30
बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपनीसाठी योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ५0 लाख डॉलरचा निधी भारतात आणावा लागेल.
