जोधपूर : फियाट या इटलीच्या कंपनीने आता पुण्याजवळ रांजणगाव येथे आपल्या नव्या ब्रँडचे जीप मॉडेल तयार करण्याची योजना तयार केली असून, त्यासाठी कंपनीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जीपचे उत्पादन या वर्षी दुसऱ्या तिमाहीत सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले.
फियाट क्रिसलर आॅटोमोबाइल्स (एफसीए) इंडियाने मंगळवारी देशात हा जीप ब्रँड दाखल केला आहे. कंपनीने दोन एसयूव्ही मॉडेल रँगलर आणि ग्रँड चेरकी बाजारपेठेत उतरविले आहेत. रँगलरची दिल्ली शोरुममधील किंमत ७१.५९ लाख रुपये तर ग्रँड चेरकी तीन प्रकारांत उपलब्ध आहे. याची दिल्लीतील किंमत ९३.६४ लाख रुपये ते १.१२ कोटी रुपये असणार आहे. सध्या हे दोन्ही मॉडेल आयात करण्यात येणार आहेत. रांजणगाव येथील प्रकल्प पूर्ण तयार झाल्यानंतर भारतातच जीप मॉडेल निर्माण केले जाणार आहेत. पुण्यातील रांजणगाव प्रकल्पात या वर्षी दुसऱ्या तिमाहीत स्थानिक उत्पादन सुरू करणार असल्याचे एफसीए इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक केविन फ्लिन यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, भारतात दाखल करण्यात आलेल्या क्रिसलर या जीपला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, या वर्षीच्या अखेरपर्यंत देशात नऊ शहरांत दहा डिलरशिप सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिले शोरूम अहमदाबादेत सुरू होत आहे. (वृत्तसंथ्या)
पुण्यात तयार होणार फियाटची ‘जीप’
फियाट या इटलीच्या कंपनीने आता पुण्याजवळ रांजणगाव येथे आपल्या नव्या ब्रँडचे जीप मॉडेल तयार करण्याची योजना तयार केली असून, त्यासाठी कंपनीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 04:33 IST2016-08-31T04:33:36+5:302016-08-31T04:33:36+5:30
फियाट या इटलीच्या कंपनीने आता पुण्याजवळ रांजणगाव येथे आपल्या नव्या ब्रँडचे जीप मॉडेल तयार करण्याची योजना तयार केली असून, त्यासाठी कंपनीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
