मुंबई : नोटाबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राची चमक फिकी झाली असून गृह प्रकल्पांची विक्री २0१0 नंतर नीचांकी पातळीवर गेली आहे. २0१६ च्या दुसऱ्या सहामाहीत घरांची विक्री आणि नव्या प्रकल्पांची घोषणा अनुक्रमे २३ टक्के आणि ४६ टक्के घटली आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘नाईट फ्रँक’ने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. २0१६ च्या शेवटच्या तिमाहीत घरांची विक्री ४४ टक्क्यांनी, तर नवीन प्रकल्पांची घोषणा ६१ टक्क्यांनी घटली आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. नाईट फ्रँक इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैशाली यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले की, संपलेल्या वर्षात अनेक उत्सावर्धक घडामोडी झाल्या.
राजकीय स्थैर्य, नियामकीय वातावरण, वाढीव पायाभूत सोयी, मजबूत गुंतवणूक आणि जीएसटी विधेयकाची मंजुरी यांचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर हे वर्ष वेगवान वाढीसह संपेल असे वाटले होते. तथापि, नोटाबंदीने या सर्वांवर पाणी फेरले आहे. देशातील सर्व शहरांत नोटाबंदींचा प्रचंड मोठा परिणाम झाला आहे.
चौथ्या तिमाहीतील घसरण फारच मोठी आहे. २0१६ च्या दुसऱ्या सहामाहीत आदल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत मोठी घसरण झाली. जागतिक पातळीवरील मंदीच्या वर्षानंतरचे हे सर्वांत वाईट वर्ष ठरले. देशातील प्रमुख ८ शहरांत रिअल इस्टेट क्षेत्राला तब्बल २२,६00 कोटींचा तोटा सोसावा लागला आहे. त्याचा फटका सरकारलाही बसला आहे. कारण १२00 कोटींचे मुद्रांक शुल्क सरकारला गमवावे लागले आहे. हा आकडा रिअल इस्टेटच्या केवळ निवासी प्रकल्पांच्या क्षेत्रातील आहे. राजधानी दिल्लीत घरांची मागणी आणि पुरवठा अनुक्रमे २९ टक्के आणि ७३ टक्के घटला. मुंबई, बंगळूर यांसह देशातील प्रमुख आठ प्रमुख शहरांना याचा फटका बसला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
रिअल इस्टेटचीही चमक फिकी
नोटाबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राची चमक फिकी झाली असून गृह प्रकल्पांची विक्री २0१0 नंतर नीचांकी पातळीवर गेली आहे. २0१६ च्या दुसऱ्या सहामाहीत घरांची विक्री
By admin | Updated: January 11, 2017 00:42 IST2017-01-11T00:42:33+5:302017-01-11T00:42:33+5:30
नोटाबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राची चमक फिकी झाली असून गृह प्रकल्पांची विक्री २0१0 नंतर नीचांकी पातळीवर गेली आहे. २0१६ च्या दुसऱ्या सहामाहीत घरांची विक्री
