Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनुकूल वातावरणामुळे बाजारातील तेजी कायम

अनुकूल वातावरणामुळे बाजारातील तेजी कायम

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली तेजी, त्याच्याच जोडीला संसदेच्या आगामी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळे सलग दुसऱ्या

By admin | Updated: November 30, 2015 00:49 IST2015-11-30T00:49:11+5:302015-11-30T00:49:11+5:30

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली तेजी, त्याच्याच जोडीला संसदेच्या आगामी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळे सलग दुसऱ्या

A favorable environment has led to market rally | अनुकूल वातावरणामुळे बाजारातील तेजी कायम

अनुकूल वातावरणामुळे बाजारातील तेजी कायम

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली तेजी, त्याच्याच जोडीला संसदेच्या आगामी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळे सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये निर्देशांक तेजीमध्ये राहिले. बाजाराचे एफएमसीजी आणि हेल्थकेअर हे दोन क्षेत्रीय निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले आहेत.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा पूर्वार्ध घसरणीचा, तर उत्तरार्ध तेजीचा राहिला. संपूर्ण सप्ताहाचा विचार करता बाजार तेजीत असल्याचे दिसून आले. सप्ताहभरात बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६० अंशांनी वाढून २६१२८.२० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८६.१५ अंशांनी वाढून ७९४२.७० अंशांवर बंद झाला.
जगभरातील शेअर बाजारांमध्ये गतसप्ताहामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. अमेरिकेमधील बेरोजगारीच्या आकडेवारीमध्ये घट झाली असून, ४२ वर्षांतील नीचांकी आकडेवारी त्याने गाठली आहे. या आकडेवारीमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय बाजारांमध्ये खरेदी करण्याकडे फारसा कल दिसून येत नाही. गतसप्ताहामध्ये या संस्थांनी ९०२.५१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. सरकारने याबाबत विरोधकांशी चर्चेची तयारी दाखविली असून, कॉँग्रेसनेही आपल्या विरोधाची धार कमी केल्याने हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह वाढलेला दिसून आला.
अमेरिकेतील बेरोजगारीच्या प्रमाणात घट झाल्याने अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या संकेतांमुळे डॉलरच्या किमतीतही वाढ होऊ लागली आहे. परिणामी गेल्या सप्ताहामध्ये रुपयाची सुमारे एक टक्क्याने घसरण झाली. याच जोडीला युरोपियन सेंट्रल बॅँकेकडून आगामी सप्ताहामध्ये व्याजदराबाबत निर्णय होणार असल्याने परकीय वित्तसंस्थांनी सावध भूमिका घेतली आहे.
आगामी सप्ताहमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडणार असल्यामुळे त्याचा बाजारावर परिणाम संभवतो. रिझर्व्ह बँकेकडून जाहीर होणारा पतधोरणाचा आढावा, त्याचप्रमाणे दुसऱ्या तिमाहीची भारतीय अर्थव्यवस्थेची आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

Web Title: A favorable environment has led to market rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.